लखनऊ | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 14 व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. दोन्ही संघांनी सलग 2 सामने गमावल्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी जोरदार लढत देत आहेत. श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. सामना पहिल्या डावात रंगतदार स्थितीत आल्यानंतर खेळ थांबवावा लागला आहे. पावसाने एन्ट्री घेतल्याने खेळ थांबवण्यात आला आहे. आता मैदानातील उपस्थित दोन्ही टीमच्या खेळाडूंना आणि असंख्य क्रिकेट चाहत्यांना पाऊस थांबून खेळ केव्हा सुरु होतोय याची प्रतिक्षा आहे.
श्रीलंकेचा स्कोअर 32.1 ओव्हरमध्ये 4 बाद 178 इतका होता.चरिथ असलंका 4 आणि धनंजया डी सिल्वा 7 धावांवर नाबाद खेळत होते. तेवढ्यात पावसाने एन्ट्री घेतली. पावसाची रिपरिप सुरु झाली. त्यामुळे खेळ थांबवण्याचा निर्णय पंचांनी घेतला. मैदानाबाहेर असलेले ग्राउंड स्टाफ वेगाने मैदानात कव्हर्स घेऊन आले. ग्राउंडस्टाफच्या मदतीला ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आला. वॉर्नरने स्टाफसोबत कव्हर्स ओढण्यात मदत केली. पूर्णपणे मुख्य खेळपट्टी झाकण्यात आली.
दरम्यान टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या श्रीलंकेने कांगारुं विरुद्ध जोरदार सुरुवात केली. पाथुम निसांका आणि कुसल परेरा या सलामी जोडीने 125 धावांची भागीदारी केली. कॅप्टन पॅट कमिन्स याने ही जोडी फोडली. पॅटने पाथुमला 61 धावांवर डेव्हिड वॉर्नर याच्या हाती कॅच आऊट केलं. पाथुमने 67 बॉलमध्ये 8 चौकारांच्या मदतीने 61 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट मिळवल्यानंतर सामन्यात कमबॅक केलं. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला ठराविक अंतराने झटके दिले.
पाथमुनंतर कुसल परेरा 78 धावांवर आऊट झाला. कॅप्टन कुसल मेंडीस याला कांगारुं विरुद्ध मोठी खेळी करण्यात यश आलं नाही. कुसल 9 धावा करुन आऊट झाला. तर सदीरा समराविक्रमा हा 8 धावा करुन माघारी परतला.
वॉर्नरची ग्राउंड स्टाफला मदत
David Warner helping the ground staffs when the rain came.
A beautiful gesture by Warner…..!!! pic.twitter.com/xUxrLmjuit
— Johns. (@CricCrazyJohns) October 16, 2023
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पाथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, महेश तीक्षना, लाहिरू कुमारा आणि दिलशान मदुशंका.