कॅनबेरा | वेस्ट इंडिज क्रिकेट टीमच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला बुधवार 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. विंडिज या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. कसोटी मालिका एकूण 2 सामन्यांची असणार आहे. तर वनडे आणि टी 20 मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने होणार आहेत. विंडिजच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात ही कसोटी मालिकेने होणार आहे. कसोटी मालिका 17 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
मालिकेतील पहिला सामना हा अडलेड ओव्हलमध्ये करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व पॅट कमिन्स करणार आहे. तर वेस्ट इंडिजच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही क्रेग ब्रेथवेट याच्याकडे असणार आहे. ऑस्ट्रेलियाने याआधी पाकिस्तानवर कसोटी मालिकेत विजय मिळवलाय. तर विंडिजने इंग्लंडला टी 20 आणि वनडे सीरिजमध्ये पराभूत केलंय. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि विंडिज दोन्ही संघांनी गत मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे उभयसंघांचा विश्वास दुणावलेला आहे. मात्र ऑस्ट्रेलिया घरात खेळत असल्याने विंडिजसमोर मोठं आव्हान असणार आहे.
पहिला सामना, 17 ते 21 जानेवारी, एडलेड.
दुसरा सामना, 25 ते 29 जानेवारी, ब्रिस्बेन.
ऑस्ट्रेलिया आणि विंडिज कसोटी मालिकेसाठी सज्ज
Ready to go @TheAdelaideOval 🤝
🎟️ https://t.co/8TPVarGRgl pic.twitter.com/rALNErFri9
— Cricket Australia (@CricketAus) January 16, 2024
एकदिवसीय मालिका
पहिला सामना, 2 फेब्रुवारी, मेलबर्न.
दुसरा सामना, 4 फेब्रुवारी, सिडनी.
तिसरा सामना, 6 फेब्रुवारी, मानुका ओव्हल.
टी 20 मालिका
पहिला सामना, 9 फेब्रुवारी, होबार्ट.
दुसरा सामना, 11 फेब्रुवारी, एडलेड.
तिसरा सामना, 13 फेब्रुवारी, पर्थ.
टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कर्णधार), अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशॅग्ने, मॅट रेनशॉ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड, स्कॉट बोलँड आणि कॅमेरॉन ग्रीन.
वेस्ट इंडिज टीम | क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), टॅगेनारिन चंद्रपॉल, किर्क मॅकेन्झी, अलिक अथानाझे, कावेम हॉज, जस्टिन ग्रीव्हस, गुडाकेश मोटी, अकीम जॉर्डन, अल्झारी जोसेफ, केमार रोच, टेविन इम्लाच, केविन इमलाच, केविन मॅककास्की आणि शामर जोसेफ.