गाबा | वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. गाबा कसोटी रंगतदार स्थितीत पोहचली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात बॅटिंग करत होती. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी चौथ्या दिवशी आणखी 156 धावांची गरज आहे. तर विंडिजचेही विजयासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. विंडिजला गाबामध्ये विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलिया 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच विंडिजवर घट्ट पकड मिळवली. ऑस्ट्रेलियाने विंडिजला दुसऱ्या डावात 193 धावांवर ऑलआऊट केलं. विंडिजकडून मेकेंजी आणि अथांजे या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दोघांचे प्रयत्न अपयशी ठरले. तर ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड आणि नेथन लायन या दोघांनी 3-3 विकेट्स घेत विंडिजला बॅकफुटवर ढकललं.
दरम्यान विंडिजकडे पहिल्या डावात 23 धावांची आघाडी होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 216 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने या धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवशी 2 विकेट्स गमावले. ऑस्ट्रेलियाने विजयी धावांचा पाठलाग करताना उस्मान ख्वाजा आणि मार्नस लबुशेन हे दोघे आऊट झाले. उस्मान ख्वाजा सहाव्या आणि मार्नस लबुशेन 11 व्या ओव्हरवर आऊट झाले. आता चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलिया विजय मिळवून 2-0 असा व्हाईट वॉश देते की विंडिज 1-1 ने मालिकेत बरोबरी करते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.
दुसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल चौथ्या दिवशी
West Indies strike late in day three to keep the Gabba Test alive 😯#WTC25 | #AUSvWI: https://t.co/X6rOXbAIMW pic.twitter.com/kx9vsJYmUl
— ICC (@ICC) January 27, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवूड.
वेस्ट इंडिज प्लेईंग ईलेव्हन | क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंद्रपॉल, किर्क मॅकेन्झी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जस्टिन ग्रीव्हस, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), केविन सिंक्लेअर, अल्झारी जोसेफ, केमार रोच आणि शामर जोसेफ.