AUS vs WI : ग्लेन मॅक्सवेल पुन्हा बसला रोहित शर्माच्या पंगतीत, वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना धू धू धूतला
ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा टी20 सामना 34 धावांनी जिंकला. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलचं वादळ पाहायला मिळलं. ग्लेन मॅक्सवेलच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 4 गडी बाद 241 धावा केल्या. तर वेस्ट इंडिजला 20 षटकात 9 गडी गमवून 207 धावाच करता आल्या.
1 / 6
ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने 34 धावांनी जिंकला. त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामना केवल औपचारिक असणार आहे.
2 / 6
नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडिजच्या बाजूने लागला होता आणि ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीचं आव्हान दिलं. सुरुवातीला ऑस्ट्रेलियाला धक्के बसले. पण मधल्या फळीतील ग्लेन मॅक्सवेलने वेस्ट इंडिजची पिसं काढली. वादळी शतकासह संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.
3 / 6
ग्लेन मॅक्सवेलने 55 चेंडूंचा सामना करत 12 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 120 धावा केल्या. मॅक्सवेलचं आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील पाचवं शतक आहे. यासह त्याने एक विक्रम आपल्या नावे केला आहे.
4 / 6
ग्लेन मॅक्सवेल टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. आता भारतीय कर्णधार रोहित शर्मासोबत अव्वल स्थान शेअर करणार आहे. रोहित शर्माने अलीकडेच जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या टी2 मध्ये पाचवे शतक झळकावलं होतं.
5 / 6
ग्लेन मॅक्सवेलने रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. ग्लेन मॅक्सवेल गेल्या काही महिन्यांपासून जबरदस्त फॉर्मात आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने अफगाणिस्तानविरुद्ध द्विशतक झळकावले होते.
6 / 6
मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी 7 कसोटी, 138 एकदिवसीय सामने आणि 102 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 339 धावा आणि 8 विकेट्स, एकदिवसीय सामन्यांमध्ये 3895 धावा आणि 70 बळी घेतले आहेत. तसेच टी20 मध्ये 2405 धावा आणि 40 विकेट घेतल्या आहेत.