रोहित शर्मा याच्या नेतृत्वात श्रीलंकेने टीम इंडियाला 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 ने पराभूत केलं. टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध तब्बल 1997 नंतर द्विपक्षीय मालिका गमवावी लागली. त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या वूमन्स इंडिया एला क्लीन स्वीपचा सामान करावा लागला आहे. ऑस्ट्रेलिया एने टीम इंडियाचा 3-0 अशा फरकाने धुव्वा उडवला आहे. टीम इंडिया एने ऑस्ट्रेलिया एला विजयासाठी 121 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 3 विकेट्स गमावून आणि 37 बॉल राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 13.5 ओव्हरमध्ये 121 धावांचं आव्हान 7 विकेट्स राखून पूर्ण केलं.
कॅप्टन ताहिला मॅकग्रा हीने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा केल्या. मॅकग्रा ने 22 बॉलमध्ये 8 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 51 रन्स केल्या. तसेच ओपनर ताहिला विल्सन हीने 26 बॉलमध्ये 39 धावांचं योगदान दिलं. ताहिलाने या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. केटी मॅक आणि चार्ली नॉट या दोघांनी प्रत्येकी 10 आणि 19 असा धावा जोडल्या. टीम इंडियाकडून मिन्नू मणी, मन्नत कश्यप आणि शबनम शकील या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियासाठी किरण नवगिरे आणि कॅप्टन मिन्नू मणी या दोघींनी सर्वाधिक धावा केल्या. किरणने 20 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 1 फोरच्या मदतीने 38 रन्स केल्या. तर मिन्नूने 23 चेंडूत 22 धावा केल्या. श्वेता सेहरावत हीने 15 धावा केल्या. प्रिया पुनियाने 11 धावा जोडल्या. तर सजीव सजनाने 10 धावांचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियासाठी निकोला हॅनकॉक, ग्रेस पार्सन्स आणि मॅटलान ब्राउन या तिघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून क्लीन स्वीप
3-0 : Australia A led by Tahlia McGrath clean sweeps T20 series against India A.
50-over series will start from 14th August.#CricketTwitter #AUSvIND pic.twitter.com/utPLqV6v7i
— Female Cricket (@imfemalecricket) August 11, 2024
ऑस्ट्रेलिया ए प्लेइंग ईलेव्हन : ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), ताहलिया विल्सन, केटी मॅक, चार्ली नॉट, टेस फ्लिंटॉफ, निकोल फाल्टम, मॅटलान ब्राउन, निकोला हॅनकॉक, टायला व्लेमिंक, ग्रेस पार्सन्स आणि सोफी डे.
टीम इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : मिन्नू मणी (कर्णधार), शुभा सतीश, प्रिया पुनिया, श्वेता सेहरावत, तनुजा कंवर, सजीवन सजना, किरण नवगिरे, शिप्रा गिरी, मेघना सिंग, मन्नत कश्यप आणि शबनम शकील.