आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचं आयोजन हे यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. या 20 पैकी पाकिस्तानचा अपवाद वगळता उर्वरित 19 संघांनी आपल्या पथकाची घोषणा केली आहे. मात्र आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. एका टीमने स्पर्धेला काही दिवस असताना ऐन क्षणी वर्ल्ड कप संघात बदल केले आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 2 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीममध्ये 2 बदल करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाने राखीव म्हणून दोघांचा समावेश करण्यात आला आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमात दिल्ली कॅपिट्ल्सचं प्रतिनिधित्व करणारा विस्फोटक फलंदाज जॅक फ्रेजर मॅकगर्क याला संधी देण्यात आली आहे. तर मॅट शॉर्ट याचाही समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. जॅक फ्रेजर मॅकगर्क याला संधी न दिल्याने दिग्गजांसह क्रिकेट चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.
जॅक फ्रेजर मॅकगर्क याने आयपीएलच्या 17 व्या हंगामात उल्लेखनीय कामगिरी केली. जॅकने या मोसमातील 9 सामन्यांमध्ये 36.67 च्या सरासरी आणि 234.04 च्या स्ट्राईक रेटने एकूण 330 धावा केल्या. जॅकने या कामगिरीमुळे टी 20 वर्ल्ड कपसाठी आपला दावा भक्कम केला होता. मात्र जॅकला संधी न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. मात्र आता जॅकचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान वर्ल्ड कपसाठी एकूण 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात ठेवण्यात आलं आहे. त्यानुसार ऑस्ट्र्लिया बी ग्रुपमध्ये आहे. ऑस्ट्रेलिया आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात 5 जून रोजी ओमान विरुद्ध करणार आहे. त्यानंतर 8 जून रोजी इंग्लंड आणि 11 जूनला नामिबिया विरुद्ध मैदानात उतरेल. तर 15 जूनला साखळी फेरीतील अखेरचा सामना हा स्कॉटलंड विरुद्ध खेळेल.
ऑस्ट्रेलियाकडून दोघांचा वर्ल्ड कप संघात राखीव म्हणून समावेश
Australia’s #T20WorldCup squad is locked in 🔒
More on the 15-player group and the pair to claim travelling reserve spots 👀https://t.co/9FJCzrWMgb
— ICC (@ICC) May 21, 2024
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम : मिचेल मार्श (कॅप्टन), डेविड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड, टीम डेविड, मार्कस स्टोयनिस, कॅमरन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, एश्टन एगर, एडम झॅम्पा, पॅट कमिंस, जोश हेजलवुड, मिचेल स्टार्क आणि नाथन एलिस.
राखीव : जेक फ्रेजर – मॅकगर्ग आणि मैट शॉर्ट.