IPL 2024 आधी विकेटकीपर बॅट्समनचा अलविदा, टीमला तगडा धक्का

| Updated on: Mar 15, 2024 | 1:57 PM

आयपीएलच्या 17 व्या हंगामाआधी स्टार विकेटकीपर बॅट्समनने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीमला मोठा धक्का लागला आहे. कोण आहे तो खेळाडू? जाणून घ्या.

IPL 2024 आधी विकेटकीपर बॅट्समनचा अलविदा, टीमला तगडा धक्का
Follow us on

कॅनबेरा | आयपीएल 17 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने भिडणार आहेत. त्याआधी क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा विकेटकीपर बॅट्समन मॅथ्यू वेड याने रेड बॉल क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे. मॅथ्यू वेड शेफील्ड शील्ड स्पर्धेतील अंतिम सामना 21 ते 25 मार्च दरम्यान पार पडणार आहे. वेड तस्मानिया टीमसाठी अखेरचा सामना खेळणार आहे. हा सामान पर्थवर आयोजित करण्यात आला आहे. या अंतिम सामन्यामुळे वेड आयपीएल 17 व्या हंगामातील 2 सामन्यांना मुकावं लागणार आहे. वेड गुजरात टायटन्स टीमचा सदस्य आहे.

वेड व्हाईट बॉल क्रिकेटबाबत काय म्हणाला?

मॅथ्यू वेड याने निवृत्तीच्या निर्णयासह ऑस्ट्रेलियासाठी व्हाईट बॉल क्रिकेट खेळत राहणार असल्याचंही स्पष्ट केलं.जून महिन्यात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतही मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलिया टीमचा सदस्य असू शकतो. मॅथ्यू वेड याने 4 वेळा शील्टचं विजेतेपद पटकावलं आहे. मॅथ्यूने या 4 पैकी 2 वेळा आपल्या नेतृत्वात विजेतेपद मिळवून दिलंय.

कुटुंबियांचे आभार

ईएसपीएनने दिलेल्या वृत्तानुसार, मॅथ्यू निवृत्तीच्या निर्णयानंतर कुटुंबियांचे आभार मानले. मी रेड बॉल क्रिकेटमधील सर्व आव्हानांचा आनंद घेतला आहे. मी व्हाईट बॉल क्रिकेट खेळत राहिन. देशासाठी कॅपसह मैदानात उतरण्याचा क्षण हा कायम लक्षात राहिल. माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण असेल, असंही मॅथ्यूने म्हटलं.

मॅथ्यू वेडचा फर्स्ट क्लास क्रिकेटला रामराम

मॅथ्यूची कसोटी आणि फर्स्ट क्लास कारकीर्द

मॅथ्यू वेड याने 2012-2021 दरम्यान 36 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. मॅथ्यूने या दरम्यान 29.87 च्या सरासरीने 1 हजार 613 धावा केल्या आहेत. वेडने या दरम्यान 4 शतकं आणि 5 अर्धशतकं ठोकली आहेत. तसेच वेडने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 165 सामन्यांमध्ये 40.81 च्या सरासरीने 9 हजार 183 धावा केल्या आहेत. दरम्यान मॅथ्यू वेड शेफील्ड शील्ड फायनलनंतर आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठी गुजरात टायटन्स टीमसोबत जोडला जाईल.