ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम सप्टेंबर महिन्यात स्कॉटलँड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया स्कॉटलँड विरुद्ध 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. तर इंग्लंड विरुद्ध टी20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. टी 20 मालिकेत 3 तर एकदिवसीय मालिकेत 5 सामने होणार आहे. स्कॉटलँड विरूद्धच्या मालिकेला बुधवार 4 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर इंग्लंड दौऱ्याचा श्रीगणेशा हा 11 सप्टेंबरपासून होणार आहे. मात्र त्याआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा झटका लागला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडूला दुखापत झाली आहे. त्यामुळे या खेळाडूला स्कॉटलँड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. आयसीसी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबतची माहिती दिली आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन याच्यावर दुखापतीमुळे दोन्ही मालिकेतून बाहेर पडण्याची वेळ ओढावली आहे. स्पेन्सरला द हन्ड्रेड या स्पर्धेत दुखापत झाली. त्यामुळे स्पेन्सरच्या जागी दोन्ही टी20i मालिकांसाठी सीन एबोट याचा समावेश करण्यात आला आहे. सीन एबोट इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतही खेळणार आहे.
स्कॉटलँड विरूद्धच्या टी20i सीरिजचं वेळापत्रक
पहिला सामना, बुधवार 4 सप्टेंबर
दुसरा सामना, शुक्रवार 6 सप्टेंबर
तिसरा सामना, शनिवार 7 सप्टेंबर
इंग्लंड विरूद्धच्या टी20i मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, बुधवार 11 सप्टेंबर
दुसरा सामना, शुक्रवार 13 सप्टेंबर
तिसरा सामना, रविवार 15 सप्टेंबर
ऑस्ट्रेलियाला दुहेरी झटका
Injury setback for Australia ahead of their tour of UK.https://t.co/LT7m7whd6R
— ICC (@ICC) August 15, 2024
स्कॉटलँड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाचा सुधारित संघ: मिचेल मार्श (कॅप्टन), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेवीहिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमरुन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, सीन एबॉट, मार्कस स्टॉयनिस आणि ॲडम झॅम्पा.
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी स्कॉटलँड टीम : रिची बेरिंग्टन (कॅप्टन), चार्ली कॅसल, मॅथ्यू क्रॉस, ब्रॅडली करी, जॅस्पर डेव्हिडसन, ख्रिस ग्रीव्ह्ज, ओली हेअर्स, जॅक जार्विस, मायकेल जोन्स, मायकेल लीस्क, ब्रँडन मॅकमुलेन, जॉर्ज मुन्से, साफयान शरीफ, ख्रिस सोल, चार्ली टीयर, मार्क वॅट आणि ब्रॅडली व्हील.