मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या सामन्यामध्ये कांगारूंनी 3 विकेट्सने विजय मिळवला. अफगाणिस्तान संघाच्या 292 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाच्या मॅक्सवेल याने एकट्याने खिंड लढवत संघाला विजय मिळवून दिला. अवघ्या 128 बॉलमध्ये नाबाद 201 धावा केल्या, यामध्ये त्याने 21 चौकार आणि 10 षटकार मारले. या विजयामध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स यानेही एक बाजू लावून धरत विकेट जावू दिली नाही. सामन्यानंतर बोलताना पॅट कमिन्स मॅक्सवेलबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हा विजय शब्दात व्यक्त करू शकत नाही, क्रिकेटमध्ये घडलेली सर्वात मोठी गोष्ट आहे. ही ग्रेट इनिंग मी मैदानातून पाहिली. मॅक्सवेल शांत होता, त्याच्याकडे प्लॅन होता. 200 धावांचा पाठिंबा करत सामना जिंकणं खरंच विशेष होतं. मॅक्सवेलच्या पायाला क्रॅम्प येत होता त्यावेळी जम्पा मैदानात येण्यासाठी तयार होता मात्र मॅक्सी मैदानाच्या बाहेर गेला नाही. हे महत्त्वाचं होतं की तुम्ही कुठुनही सामन्यात कमबॅक करू शकता, आता आम्ही सेमी फायनलमध्ये प्रवेश केला असून ही मोठी गोष्ट असल्याचं पॅट कमिन्स म्हणाला.
मॅक्सवेलला वरच्या फळीमधील कोणाची साथ मिळाली नाही त्यामुळे संघाची अवस्था वाईट झालेली. कमिन्सने 68 बॉलमध्ये 12 धावा केल्या पण त्या धावा मॅक्सवेलच्या द्विशतकाच्या बरोबरीच्या आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण मॅक्सवेलला कोणीच साथ देत नव्हत, सर्व खेळाडू कागदी वाघ ठरले. अफगाणिस्तान संघाने विजय मिळवलाचा होता पण एक चूक त्यांना महागात पडली. ग्लेन मॅक्सवेलचा झेल त्यांनी सोडला अन् तिथूनच त्यांच्या परभवाची स्क्रिप्ट लिहिली गेली.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि नवीन-उल-हक.