ख्राईस्टचर्च | ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात न्यूझीलंडवर 3 विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला या विजयासह 2-0 अशा फरकाने क्लिन स्वीप दिला. ऑस्ट्रेलियाला या विजयानंतर मोठा फायदा झालाय. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडला मोठा झटका लागलाय. न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या सामन्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळी पॉइंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. तर टीम इंडियावर याचा काही परिणाम झालाय का, हे आपण जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप पॉइंट्स टेबलमध्ये जितका फायदा झालाय, तितकाच फटका न्यूझीलंडला बसला आहे. ऑस्ट्रेलियाला डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये एका स्थानाचा फायदा झालाय. तर न्यूझीलंडची एका स्थानाने घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर दोन्ही सामन्यात विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया या सामन्याआधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होती. तर न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर होती. मात्र आता अदलाबदल झाली आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी पोहचलीय. तर न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावरुन तिसऱ्या स्थानी पोहचली आहे.
दरम्यान उभयसंघातील सामन्याच्या निकालानंतर टीम इंडियावर कोणताही परिणाम झालेला नाही. टीम इंडियाने धर्मशालेत इंग्लंड विरुद्ध पाचवा आणि अंतिम कसोटी सामना जिंकून अव्वलस्थान आणखी भक्कम केलं. तर त्याआधी ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर पहिल्या कसोटीत विजय मिळवल्याने टीम इंडियाने पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली होती.
टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या 9 पैकी 6 सामन्यात विजय मिळवलाय. तर 1 सामना ड्रॉ राहिलाय. तर टीम इंडियाने प्रत्येकी 1-1 सामना हा दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड विरुद्ध गमावला आहे. तर ऑस्ट्रेलियाने 12 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तर 3 सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. तेच एकमेव सामना हा अनिर्णित राहिलाय.
ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या स्थानी झेप
Australia’s thrilling win in Christchurch has propelled them to the second spot in the #WTC25 standings 🙌
Full table ➡️ https://t.co/ELy3JEqN8j pic.twitter.com/bQRvPeibBs
— ICC (@ICC) March 11, 2024
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टीम साउथी (कॅप्टन), टॉम लॅथम, विल यंग, केन विल्यमसन, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, स्कॉट कुग्गेलिजन, मॅट हेन्री आणि बेन सियर्स.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवूड.