मुंबई | टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. टीम इंडिया यासह न्यूलँड्स केपटाऊनमध्ये विजय मिळवणारी पहिली आशियाई टीम ठरली. या विजयानंतर टीम इंडियाला 24 तासांच्या आत मोठा झटका लागला आहे. आयसीसीने टीम इंडियासाठी वाईट बातमी दिली आहे.
आयसीसीने टेस्ट टीम रॅकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये टीम इंडियाला मोठं नुकसान झालं आहे. टीम इंडियाने सिहांसन गमावलं आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला मागे टाकत पुन्हा एकदा नंबर 1 होण्याचा बहुमान मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 3 सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाला सलग 2 विजयांचा फायदा हा नंबर 1 होण्यात झाला आहे. तर टीम इंडियाला दुसरा सामना जिंकूनही अव्वल स्थान कायम राखता आलं नाही.
ताज्या आकडेवारीनुसार, आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये आता ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे. तर टीम इंडियाची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. मात्र दोन्ही संघांमध्ये फक्त 1 रेटिंगचा फरक आहे. ऑस्ट्रेलिया 118 रेटिंग्ससह अव्वल स्थानी आहे. तर टीम इंडिया 117 रेटिंग्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर इंग्लंड तिसऱ्या, दक्षिण आफ्रिका चौथ्या आणि न्यूझीलंड पाचव्या क्रमांकावर आहे.
टीम इंडियाला दक्षिण आफ्रिके विरुद्ध पहिल्या कसोटीत 1 डाव आणि 32 धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे टीम इंडियाला 1 रेटिंगने नुकसान सहन करावं लागलं होतं. तर टीम इंडियाने दुसरा सामना ड्रा केल्याने रेटिंग 118 वरुन 117 इतकी झाली. त्यामुळे टीम इंडियाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली. तर ऑस्ट्रेलिया 118 रेटिंग्ससह पहिल्या क्रमांकावर पोहचली.
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धोबीपछाड
A new No.1 side is crowned in the @MRFWorldwide ICC Men’s Test Team Rankings 👑
More ⬇️
— ICC (@ICC) January 5, 2024
दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात सिडनीत तिसरा आणि अंतिम कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलिया आधीच 2-0 ने आघाडीवर असल्याने त्यांना पाकिस्तानला 3-0 ने व्हाईटवॉश देण्याची संधी आहे. आता ही मालिका झाल्यानंतर पुन्हा एकदा आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये अपडेट पाहायला मिळतील. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या रेटिंगसमध्ये निश्चितच वाढ पाहायला मिळेल.