मुंबई : वर्ल्ड कप 2023 ला सुरू व्हायला अवघे काही दिवस बाकी आहेत. यंदाचा वर्ल्ड कप भारतात होणार असल्याने टीम इंडिया प्रबळ दावेदार मानलं जात आहे. वर्ल्ड कपमधील दहा देशांनी आपल्या संघांची घोषणी केली आहे. आयसीसीने सर्व संघांना 5 सप्टेंबरपर्यंत खेळाडूंची नावे जाहीर करण्यास सांगिली होतीत. यंदा फायनलमध्ये कोणता संघ जाणार याबाबत आजी माजी खेळाडू भाकित करत आहेत. अशातच ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार खेळाडू मिचेल मार्श यानेही फायनलमध्ये कोणते संघ जातील याबाबत अंदाज वर्तवला आहे.
वर्ल्ड कपच्या फायनलबाबत बोलताना, फायनल सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रिलिया या दोन संघांमध्ये होईल, असं भाकित वर्तवलं आहे. सोशळ मीडियावर मिचेल मार्श याला ट्रोल केलं जात आहे. वर्ल्ड कप भारतामध्ये असल्याने आजी-माजी खेळाडूंनी भाकित वर्तवलीत त्यामध्ये भारत फायनलमध्ये जाणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र मार्शला पाकिस्तान संघावर इतका कसा काय विश्वास आहे? असा सवाल चाहते करत आहेत.
टीम इंडियाला यंदाच्या वर्ल्डकपध्ये प्रबळ दावेदार मानलं जात आहे. कारण घरच्या मैदानांवर सामने होणार असल्याने त्याचा फायदा सर्व खेळाडूंना होणार आहे. मिचेल मार्शला वाटतं की भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचणार नाही. पाकिस्तान भारतामध्ये येत फायनलपर्यंत बाजी मारेल हा त्याला विश्वास आहे, मात्र भारतीय खेळाडूंच्या घरच्या मैदानावर असूनही ते फायनलपर्यंत नाही मजल मारणार असं त्याला वाटत आहे.
Mitchell Marsh – I honestly think the ODI World Cup final will be played between Australia and Pakistan this year.pic.twitter.com/0wCKlhZO2Z
— Nawaz 🇵🇰 (@Nawaz_888) September 8, 2023
दरम्यान, टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघासोबतच होणार आहे. वर्ल्ड कप थरार 5 ऑक्टो़बरपासून सुरू झाल्यावर तिसऱ्याच दिवशी म्हणजेच 8 ऑक्टोबरला टीम इंडिया आणि कांगारू आमने-सामने येणार आहेत. मिचेल मार्श याच्या वक्तव्याने भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्याचं काही चाहत्यांनी म्हटलं आहे. मात्र याचा वचपा म्हणजे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजल्यावर मार्शला कोणता संघ फायनलमध्ये जाणार हे लक्षात येईल.