नवी दिल्ली : सध्या सगळीकडे विराटचीच (Virat Kohli) चर्चा आहे. कारण, विराटकडून आशा वाढल्या आहेत. आशिया चषकात (Asia Cup 2022) आपल्याला यश मिळालं नसलं तरी विराट कोहली त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आणि पुन्हा त्याची जादू दाखवून दिली. त्यानं आपलं बहुप्रतिक्षित शतक (Virat Kohli Century) झळकावलं आणि सगळीकडे पुन्हा एकदा विराटच विराट, असं बोललं जाऊ लागलं.
विराटनं आशिया चषकात आयपीएलची (IPL 2022) पूर्ण कसर भरून काढली. हे सर्व सोपं नव्हतं. त्याला यापूर्वी प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं. लोकांनी त्याला ट्रोलही केलं. पण, त्याने संयमानं सर्व गोष्टी हाताळल्या. अखेर त्याला आशिया चषकात यश मिळालं आणि पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगला फॉर्म दाखवण्याची मागणी होतेय.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका खेळायची आहे. ती मंगळवारपासून सुरू होत आहे. आशिया चषकासारखाच फॉर्म या मालिकेत दिसण्याची अपेक्षा आहे. सामन्यापूर्वी कोहलीनं नेटमध्ये खूप घाम गाळला आणि यादरम्यान तो चांगलाच फॉर्ममध्ये दिसला.
विराटच्या एका व्हिडीओत तो फलंदाजी करताना दिसत आहे. तो चेंडू बॅटच्या मध्यभागी चांगला घेत आहे आणि फटकारे मारत आहे. वेगवान गोलंदाजांवर पुल शॉट घेणे असो किंवा फिरकीपटूंसमोर खेळणे असो, विराट कोहलीनंही आपले इरादे स्पष्ट केल्याचं दिसतंय.
An absolute treat?
Watch @imVkohli dedicatedly practicing his shots in the nets today during practice session@gulzarchahal @BCCI @CricketAus #gulzarchahal #1stT20I #pca #pcanews #punjabcricket #punjab #cricket #teamindia #indiancricketteam #punjabcricketnews #cricketnews pic.twitter.com/ZKrCldbKbg— Punjab Cricket Association (@pcacricket) September 18, 2022
कोहली हा नेटवर सराव करणाऱ्या पहिल्या फलंदाजांपैकी एक होता. त्याचं लक्ष संपूर्णपणे शॉर्ट पिच चेंडू खेळण्यावर होतं. 45 मिनिटांच्या सत्रात त्यानं अनेक वाढत्या चेंडूंचा सामना केला.
कोहली टी-20 फॉरमॅटमध्ये 11,000 धावा करण्यापासून फक्त 98 धावा दूर आहे. जर त्याने हे केले तर तो या टप्प्यावर पोहोचणारा भारतीय फलंदाज ठरेल. टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या पुढे असलेल्या सर्वांच्या 11,000 पेक्षा जास्त धावा आहेत.