AUS vs AFG Live Streaming | ऑस्ट्रेलियाला पराभूत करत अफगाणिनस्तान उलटफेर करणार?

| Updated on: Nov 07, 2023 | 1:10 AM

Afghanistan vs Australia Live Streaming | ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांचा वर्ल्ड कप 2023 मधील आठवा सामना आहे. या सामन्याबाबत जाणून घ्या सर्वकाही.

AUS vs AFG Live Streaming | ऑस्ट्रेलियाला पराभूत करत अफगाणिनस्तान उलटफेर करणार?
Follow us on

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 38 वा सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम सेमी फायनलमध्ये पोहचण्यापासून एक पाऊल अर्थात एका विजयापासून दूर आहे. तर अफगाणिस्तानसमोर सेमी फायनलमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यक आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलियाने सलग 2 सामने गमावल्यानंतर सलग 5 सामन्यात विजय मिळवलाय. तर अफगाणिस्ताननेही या स्पर्धेत आतापर्यंत 4 उलटफेर करत 8 पॉइंट्स मिळवले आहेत. त्यामुळे हा सामना रंगतदार, चुरशीचा आणि थरारक होण्याची आशा,अपेक्षा आहे. हा सामना कधी होणार, कुठे होणार, टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार हे सविस्तर जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान सामना केव्हा?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामना मंगळवारी 7 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान सामना कुठे?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान सामना किती वाजता सुरुवात होणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहायला मिळेल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान सामना मोबाईलवर हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

अफगाणिनस्तान क्रिकेट टीम | हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), इकराम अलीखिल (विकेटकीपर), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, नूर अहमद, नजीबुल्ला झदरन, नवीन-उल-हक, अब्दुल रहमान आणि रियाझ हसन.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), जोश इंग्लिस (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, शॉन एबॉट आणि एलेक्स कॅरी.