AUS vs BAN Live Streaming | पुण्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने, कोण जिंकणार?

| Updated on: Nov 11, 2023 | 1:28 AM

Australia vs Bangladesh Live Streaming | बांगलादेशला या वर्ल्ड कपमध्ये त्यांच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. क्रिकेट चाहत्यांना बांगलादेशकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध पैसावसून सामन्याची अपेक्षा असणार आहे.

AUS vs BAN Live Streaming | पुण्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने, कोण जिंकणार?
Follow us on

पुणे | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये शनिवारी 11 नोव्हेंबर रोजी स्पर्धेतील अखेरच्या डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश आणि इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान हे चार संघ भिडणार आहेत. या डबल हेडरमधील पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात पार पडणार आहे. ऑस्ट्रेलियाने सलग 6 सामने जिंकून सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलं आहे. तर बांगलादेश आधीच वर्ल्ड कपमधून बाहेर पडली आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना म्हणजे औपचारिकता आहे. मात्र बांगलादेशचा हा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर ऑस्ट्रेलिया आणखी एक विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामना केव्हा?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामना शनिवारी 11 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामना कुठे?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये आयोजित करण्याता आला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामना किती वाजता सुरु होणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामना सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर 10 वाजता टॉस होईल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामना टीव्हवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामना मोबाईलवर कुठे बघायला मिळेल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सामना मोबाईलवर मोफत डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

ऑस्ट्रेलिया टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), जोश इंग्लिस (विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन आणि स्टीव्हन स्मिथ.

बांगलादेश क्रिकेट टीम | नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), तनझिद हसन, लिटन दास, अनामुल हक, महमुदुल्लाह, तॉहिद हृदोय, मेहीदी हसन मिराझ, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, नसुम अहमद आणि महेदी हसन हसन महमूद.