अॅडलेडमधील पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्मा टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करु शकतो. टीम इंडियाला बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 10 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होतं. ऑस्ट्रेलियाने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. टीम इंडियाने या मालिकेतील सलामीच्या सामन्यात विजयाने सुरुवात केली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया सातत्य राखण्यात अपयशी ठरली. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होण्याची चिन्हं आहेत. उभयसंघातील तिसरा सामना हा 14 डिसेंबरपासून द गाबा, ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडियातील तिघांना अॅडलेडमधील पराभवानंतर डच्चू दिला जाऊ शकतो. या तिघांमध्ये केएल राहुल, हर्षित राणा आर अश्विन यांची नावं आघाडीवर आहेत. केएल राहुल याच्या जागी रोहित शर्मा पुन्हा ओपनिंगला येऊ शकतो. तिसऱ्या स्थानी शुबमन गिल फिक्स आहे. तर चौथ्या क्रमांकावर विराट कोहली बॅटिंगसाठी येण्याची शक्यता आहे. तर ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर बॅटिंग करताना दिसू शकतो. तसेच केएलला कायम ठेवल्यास तो सहाव्या स्थानी येऊ शकतो.
केएल पहिल्या दोन्ही सामन्यात यशस्वी जयस्वाल याच्यासह सलामी दिली. रोहित पहिल्या सामन्यात उपस्थित नव्हता. तर दुसऱ्या सामन्यात टीमच्या फायद्यासाठी रोहितने केएलला सलामीला खेळवण्याचा निर्णय केला. मात्र आता केएलला सहाव्या स्थानी खेळावं लागू शकतं. अश्विनच्या जागी वॉशिंग्टन सुंदर किंवा रवींद्र जडेजा या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. तर हर्षित राणा याच्या जागी आकाश दीप याला संधी मिळू शकते.
तिसऱ्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वाशिंगटन सुंदर/रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज आणि आकाशदीप.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.