मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून टीम इंडियाला विजयासाठी 280 धावा आवश्यकता आहे. भारताने रोहित शर्मा, शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा हे आघाडीचे फलंदाज गमावले असून 7 गड्यांना हा स्कोअर गाठायचं आहे. लक्ष्य कठीण असलं तरी भारतीय फलंदाजांकडे टी 20 चा अनुभव आहे. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली तर विजय सोपा होऊ शकतो. त्यामुळे हार न पत्काराता विजयासाठीच लढत दिली पाहीजे.
भारताने चौथ्या दिवशी 3 बाद 164 धावांची खेळी केली आहे. अजूनही भारताला विजयासाठी 280 धावांची आवश्यकता आहे. पण यासाठी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना संयमी खेळी करावी लागेल. पाचव्या दिवशी 90 षटकांचा खेळ उरला असून 7 गडी हातात आहेत. करो या मरोच्या लढाईत टी 20 सारखी रणनिती अवलंबली तरी विजय खेचून आणू शकतो. यासाठी उरलेल्या खेळाडूंनी आत्मविश्वासाने खेळणं गरजेचं आहे.
विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे जोडीकडून क्रीडाप्रेमींना मोठ्या अपेक्षा आहेत. काही करून दोन्ही खेळाडूंनी शतकी खेळी केल्यास जिंकण्याच्या आशा वाढतील. पण ऑस्ट्रेलियाची भेदक गोलंदाजी पाहता ते शक्य होईल असं वाटत नाही.
WTC FINAL. WICKET! 20.4: Cheteshwar Pujara 27(47) ct Alex Carey b Pat Cummins, India 93/3 https://t.co/0nYl21pwaw #WTC23
— BCCI (@BCCI) June 10, 2023
रोहित शर्माची विकेट काढण्यात नाथन लायनला यश मिळालं आहे. विकेट सांभाळणं महत्त्वाचं असताना दुसरी विकेट गेली आणि संघावरील दडपण वाढलं.
टीम इंडियाने 444 धावांच्या विजयी आव्हानाचं पाठलाग करताना पहिली विकेट गमावली आहे. बॉलंडने शुबमन गिल याला कॅप्टन कॅमरुन ग्रीन याच्या हाती कॅच आऊट केलं. शुबमनने 18 धावांची खेळी केली. दरम्यान पहिली विकेट गमावल्यानंतर टी ब्रेक झाला आहे. टीम इंडियाने 7.1 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 41 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी आणखी 403 धावांची गरज आहे.
टीम इंडियाच्या दुसऱ्या आणि सामन्यातील चौथ्या डावाची सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने 173 धावांच्या आघाडीसह दुसरा डाव हा 270 धावांवर घोषित केला. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 444 धावांचं मजबूत आव्हान मिळालंय. या विजयी आव्हानाचं पाठलाग करायला रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 8 गडी गमवून 270 धावांवर घोषित केला आहे. त्यामुळे पहिल्या डावातील 173 धावांची आघाडी आणि 270 धावा असं मिळून 443 धावांचं आव्हान मिळालं आहे. हे आव्हान भारतीय संघ गाठणार का? हे महत्त्वाचं आहे. खेळपट्टी पूर्णत: गोलंदाजांना सपोर्ट करणारी असून चेंडूही नवीन आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार आहे.
मिशेल स्टार्कच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसला आहे. मोहम्मद शमीने त्याला बाद केलं. मात्र असं असलं तरी ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आहे. भारतासमोर मोठं आव्हान उभं राहिलं असून क्रीडाप्रेमींनी ट्रोल करण्यास सुरुवात केलं आहे.
WTC FINAL. WICKET! 82.6: Mitchell Starc 41(57) ct Virat Kohli b Mohammad Shami, Australia 260/7 https://t.co/0nYl21pwaw #WTC23
— BCCI (@BCCI) June 10, 2023
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 223 धावा करत 400 धावांच्या टप्प्यात आले आहेत. त्यात कॅरे आणि स्टार्कने भारतीय गोलंदाजांना चांगलंच दमवलं आहे. त्यामुळे भारताला मोठं आव्हान मिळणार हे तितकंच खरं आहे. एलेक्स कॅरेनं आपलं अर्धशतक झळकावलं आहे.
ऑस्ट्रेलियाने 6 बाद 200 धावांचा पल्ला गाठला आहे. ऑस्ट्रेलियाकडे 373 मजबूत आघाडी निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांचा कस लागणार आहे.
कॅमरोन ग्रीन आणि कॅरे ही जोडी फोडण्यात रवींद्र जडेजाला यश आलं आहे. जडेजाची फिरकीची जादू कळली नाही. अखेर चेंडू स्टम्पला आदळला आणि तंबूचा रस्ता दाखवला. कॅमरून ग्रीन 25 धावा करून बाद झाला.
WTC FINAL. WICKET! 62.6: Cameron Green 25(95) b Ravindra Jadeja, Australia 167/6 https://t.co/0nYl21pwaw #WTC23
— BCCI (@BCCI) June 10, 2023
सुरुवातीच्या षटकात लाबुशेनला तंबूचा रस्ता दाखवल्यानंतर ग्रीन आणि कॅरेची जोडी जमली आहे. त्यामुळे धावांमध्ये भर पडत असून भारताला मोठं आव्हान मिळेल अशी शक्यता आहे. ही जोडी फोडण्यासाठी भारतीय गोलंदाजांचे प्रयत्न सुरु आहेत.
ऑस्ट्रेलियाचे गडी झटपट बाद करण्याचं आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर आहे. ही स्थिती लक्षात घेऊन भारतीय गोलंदाज गोलंदाजी करत आहे. उमेश यादवने पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. अर्धशतकाच्या वाटेवर असलेल्या लाबुशेनला तंबूचा रस्ता दाखवला.
WTC FINAL. WICKET! 46.4: Marnus Labuschagne 41(126) ct Cheteshwar Pujara b Umesh Yadav, Australia 124/5 https://t.co/0nYl21pwaw #WTC23
— BCCI (@BCCI) June 10, 2023
चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला असून भारतीय गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून लाबुशेन आणि कॅमरोन ग्रीन ही जोडी मैदानात आहे. उमेश यादवच्या हाती पहिलं षटक सोपवण्यात आलं आहे.
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव : 123-4, 44 ओव्हर, एकूण 296 धावांची आघाडी.
टीम इंडियाचा पहिला डाव : 296 ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाला 173 धावांची आघाडी.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव : 469 ऑलआऊट