मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेमधील तिसऱ्याही टी-20 सामन्यामध्ये विजय मिळवला. साऊथ आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला 192 धावांचं लक्ष्य दिलं होतं. कांगारूंच्या संघाने 18 ओव्हरमध्ये हे आव्हान पूर्ण करत सामना खिशात घातला. तिसराही टी-20 जिंकत ऑस्ट्रेलियाने साऊथ आफ्रिकेने 3-0 ने सीरीज जिंकत सुफडा केला आहे. ट्राविस हेड याने 48 चेंडूत सर्वाधिक 91 धावा केल्या होत्या.
साऊथ आफ्रिकेकडून रीझा हेंड्रिक्स सलामीला आला त्याने दमदार फलंदाजी केली. टेम्बा बावुमाला भोपळाही फोडता आला नाही. तर ब्रेट्झके हा अवघ्या 5 धावा करून परतला. त्यानंतर कर्णधार एडन मार्करम याने 41 धावा आणि डोनाव्हॉन फरेरा याने सर्वाधिक 48 धावा केल्य होत्या. 20 ओव्हरमध्ये अखेर ऑस्ट्रेलिया संघाला 192 धावांचं लक्ष्य दिलं.
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदनात उतरलेल्या कांगारूंकडून सलामीला आलेल्या ट्राविस हेड याने 48 चेंडूत 91 धावा केल्या. जोश इंग्लिस याने 42 धावा आणि मार्कस स्टॉइनिसने नाबाद 37 धावा करत सामना जिंकवला. हेडने घातक फलंदाजी करत साऊथ आफ्रिकेच्या बॉलर्सला घाम फोडला, अवघ्या 9 धावांनी त्याचं शतक हुकलं. वर्ल्ड कपआधी टी-20 मध्ये ज्या फॉर्ममध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ दिसत आहे त्यावरून वर्ल्ड कपच्या दावेदारीवर त्यांनीसुद्धा दावा केल्यासारखा आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रिलियामध्ये वर्ल्ड कपआधी एक वन ड मालिक खेळवण्यात येणार आहे. यामध्ये दोन्ही संघांची रंगीत तालीम होणार आहे.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (C), जोश इंग्लिस (W), मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, अॅश्टन टर्नर, शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन, तन्वीर संघा
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रीझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा, मॅथ्यू ब्रेट्झके, एडन मार्करम (C), डोनाव्हॉन फरेरा, ट्रिस्टन स्टब्स (W), ब्योर्न फॉर्च्युइन, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, लिझाद विल्यम्स, लुंगी एनगिडी