मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. इंग्लंड संघाने टॉस जिंकत झकास सुरूवात केली होती. मात्र दिग्गज स्पनिर आर. अश्विन याने दोन आणि जडेजाने एक विकेट घेत पाहुण्यांना पहिल्याचं सत्रात तीन धक्के दिलेत. टीम इंडिया आणि इंग्लंडमधील कसोटी सुरू असताना दुसरीकडेे वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या खेळाडूला प्लेइंग 11 मध्ये खेळवण्याचा धक्कादायक निर्णय टीम मॅनेजमेंटने घेतला आहे. कोण आहे तो खेळाडू जो कोरोना असताना सामना खेळत आहे.
द गाबा या मैदानावर टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील दुसऱ्या कसोटी सामन्याआधी ऑल राऊंडर खेळाडू कॅमेरून ग्रीन याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यामध्ये तो खेळणार नाही असंच वाटत होतं. मात्र दोन्ही संघ सामन्याआधी राष्ट्रगीतासाठी मैदानात उतरले तेव्हा कॅमेरून ग्रीनसुद्धा आला होता. राष्ट्रगीतासाठी मैदानात उतरलेला ग्रीन आपल्या संघापासून काहीसा दूर उभा राहिला. बाकी खेळाडूंना संसर्ग होऊ नये म्हणून त्याने काळजी घेतली.
Cameron Green pic.twitter.com/ImOM9rE0n5
— RVCJ Media (@RVCJ_FB) January 25, 2024
सोशल मीडियावर ग्रीनचा फोटो जोरदार व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. कोरोना म्हटलं तरी काळजात धस्स… होतं. पण ऑस्ट्रेलिया टीम मॅनेजमेंटने काय विचार करून असा निर्णय घेतलाय हे काही स्पष्ट केलं नाही. ग्रीन बाजूला उभा राहिला तरी फिल्डिंगवेळी बॉल तर पकडणारच. त्यामुळे इतर खेळाडूंसह विरोधी संघालाही धोका आहे.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.
वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन): क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), तेजनारिन चंदरपॉल, किर्क मॅकेन्झी, अॅलिक अथांजे, क्वाम हॉज, जस्टिन ग्रीव्हज, जोशुआ दा सिल्वा, केविन सिंक्लेअर, अल्झारी जोसेफ, केमार रोच, शमर जोसेफ.