AUS vs BAN | मिचेल मार्श याची 177 धावांची झंझावाती खेळी, ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने विजय

| Updated on: Nov 11, 2023 | 7:49 PM

Australia vs Bangladesh | ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपमधील आपला अखेरचा साखळी फेरीतील सामना हा मोठ्या फरकाने जिंकलाय. मिचेल मार्श हा ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला.

AUS vs BAN | मिचेल मार्श याची 177 धावांची झंझावाती खेळी, ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने विजय
Follow us on

पुणे | ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने वर्ल्ड कप 2023 मधील 43 वा सामना जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवलाय. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 307 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात 44.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श याने सर्वाधिक 177 धावांची नाबाद खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा हा वनडे वर्ल्ड कप 2023 मधील सलग सातवा विजय ठरला. तर बांगलादेश विजयी शेवट करण्यात अपयशी ठरली.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

ऑस्ट्रेलिया 307 धावांचा पाठलाग करताना पहिली विकेट झटपट गमावली. ट्रेव्हिस हेड 10 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 120 धावांची शतकी भागीदारी केली. डेव्हिड वॉर्नर 61 बॉलमधये 53 धावांची अर्धशतकी खेळी करुन माघारी परतला. त्यानंतर मिचेल मार्श आणि स्टीव्हन स्मिथ या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 175 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. मिचेलने या दरम्यान शतक पूर्ण केलं. मिचेल आणि स्टीव्हन ही जोडी ऑस्ट्रेलियाच्या विजयाची शिल्पकार ठरली.

मिचेल मार्श याने 17 चौकार आणि 9 सिक्सच्या मदतीने 132 बॉलमध्ये नाबाद 177 धावा केल्या. तर स्टीव्हन स्मिथने 64 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्ससह नॉट आऊट 63 रन्स केल्या. बांगलादेशकडून तास्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूडबेंच अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क.

बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), तांझिद हसन, लिटॉन दास, महमुदुल्ला, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), तॉहिद हृदॉय, मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान.