बॉर्डर गावस्कर कसोटी कसोटी मालिकेतील चौथा सामना भारताच्या हातून गेल्यातच जमा आहे. पहिल्या डावात भारवार फॉलोऑनची नामुष्की ओढावली आहे. या सामन्यात नवख्या सॅम कोनस्टासने चांगली सुरुवात करून दिली. स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहाला सुद्धा सोडलं नाही. असं असताना विराट कोहलीने जाणूनबुजून सॅम कोनस्टासला धक्का दिला.ऑस्ट्रलियाच्या डावातील 11 व्या षटकाच्या ब्रेक दरम्यान हे प्रकरण घडलं. विराट कोहलीने कोनस्टासच्या जवळून जाताना त्याला खांद्याने धक्का मारला. कोनस्टासला असं वागणं आवडलं नाही आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तसेच पंचांनी मध्यस्थी करून हे प्रकरण थंड केलं. या प्रकरणाची गंभीर दखल आयसीसीने घेतली. सामना फीच्या 20 टक्के दंड आणि एक डिमेरिट गुण दिला. पण आयसीसीच्या या कारवाईने ऑस्ट्रेलियन मिडिया नाराज असल्याचं दिसत आहे. ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्रांनी विराट कोहलीवर निशाणा साधला.
‘द वेस्ट ऑस्ट्रेलियन’ वर्तमानपत्राने कोहलीचा उल्लेख जोकर (Clown) असा केला. या वर्तमानपत्राने Clown Kohli असं शीर्षक दिलं आहे. इतक काय तर ‘द वेस्ट ऑस्ट्रेलियन’ वर्तमानपत्राने कोहलीला Sook म्हणजे रडणारा असं म्हंटलं आहे. डेली टेलिग्राफ या वृत्तपत्रानेही विराट कोहलीचा समाचार घेतला आहे. सॅम कोनस्टासचे कौतुक करत या वृत्तपत्राने ‘किंग कोन’ असा मथळा दिला आहे . माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंग आयसीसीच्या निर्णयावर नाराज दिसला.दिलेली शिक्षा एकदम क्षुल्लक असल्याचं त्याने सांगितलं.
The back page of tomorrow’s The West Australian. 🤡🤡🤡@westaustralian @TheWestSport pic.twitter.com/3BaiB3SOQi
— Jakeb Waddell (@JakebWaddell) December 26, 2024
The Tele today capturing the Sam Konstas innings with the headline ’King Kon’ & lets not forget how Sam rattled the Indians especially the dummy spitter Virat Kohli. pic.twitter.com/u3o7F5aDXS
— OBBY (@OBBY001) December 26, 2024
विराट कोहलीला 2019 नंतर पहिल्यांदाच डिमेरिट गुण मिळाला आहे. डिमेरिट गुण खेळाडूच्या नावावर दोन वर्षे असतो. त्यामुळे तो गुण आता लागू होणार नाही. दुसरीकडे, सुनील गावस्कर यांनी ऑस्ट्रेलियन मीडियावर निशाणा साधला. ‘ऑस्ट्रेलियन मिडिया 12वा खेळाडू म्हणून काम करते. ते कायम प्रतिस्पर्धी खेळाडूंना टार्गेट करतात. जे खेळाडू त्रासदायक ठरतात त्यांच्यावर खासकरून निशाणा साधतात. विराट कोहलीला कव्हर पेजवर ठेवून वर्तमानपत्रांची विक्री वाढते हे विसरून चालणार नाही. विराट कोहली कर्णधार नसतात त्याच्यासोबत पॅट कमिन्सचा फोटो छापला. हे सर्व खळबळजनक आहे.’, असं सुनील गावस्कर यांनी सांगितलं.