मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा वनडे सामना राजकोटमध्ये सुरु आहे. या ठिकाणी प्रचंड उकाडा असल्याने ऑस्ट्रेलियन फलंदाज हैराण झाले. दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा तर उकाड्यामुळे अस्वस्थ झाल्याचं दिसून आला. इतकंच भर मैदानात खुर्ची मागवावी लागली. इतकंच काय तर डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवण्याची वेळ आली. हा संपूर्ण प्रकार वॉशिंग्टन सुंदर टाकत असलेल्या 29 व्या षटकात पाहायला मिळाला. मिचेल मार्श 96 धावा करून बाद झाला. यानंतर विकेट ब्रेक मिळाला पण स्टीव्ह स्मिथ अक्षरश: गळून पडला होता. त्यामुळे त्याने थेट ड्रेसिंग रुमकडून मदत मागवली.
स्टीव्ह स्थित याची परिस्थिती पाहून विराट कोहली मार्नस लाबुशेन याच्याकड आला आणि त्याची फिरकी घेऊ लागला. या दरम्यान कोहलीन डान्सही केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टीव्ह स्मिथ 61 चेंडूत 74 धावा करून बाद झाला. मोहम्मद सिराजने त्याला पायचीत केलं. स्मिथने वनडे क्रिकेट कारकिर्दित 5 हजार धावांचा पल्लाही गाठला आहे.
This man is 😅👍 Virat Kohli – what a character!
He's having fun with Marnus Labuschagne while Steven Smith is chilling in the hot afternoon.#MitchellMarsh #SteveSmith #INDvsAUS #RohitSharma #ViratKohli #3rdODI #ICCWorldCup #BabarAzam𓃵 #subhmangill #ICCRankings #Tiger3 #DIORSS pic.twitter.com/dkQ1dV7Bhy
— rapchickbhai. (@rapchickbhai) September 27, 2023
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 7 गडी गमवून 352 धावा केल्या. तसेच विजयासाठी 353 धावांचं आव्हान ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियाकडू डेविड वॉर्नरने 56, मिचेल मार्शने 96, स्टीव्ह स्मिथने 74 आणि लाबुशेननं 72 धावा केल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 3 गडी बाद केले. प्रसिद्ध कृष्णाने 2, सिराज 1, रवींद्र जडेजा 1 आणि वॉशिंग्टन सुंदर याने 1 गडी बाद केला.
भारताने तीन सामन्यांची मालिका आधीच 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकताच ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश मिळणार आहे. आता ऑस्ट्रेलियाने दिलेलं 353 धावांचं आव्हान टीम इंडिया गाठणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, तनवीर संघा, जोश हेझलवूड
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्धा कृष्णा