Icc W World Cup 2023 Final | ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप विजयाची हॅटट्रिक पूर्ण करणार?

| Updated on: Feb 25, 2023 | 11:39 PM

ऑस्ट्रेलिया सर्वात यशस्वी टीम आहे. मात्र असं असलं तरी दक्षिण आफ्रिका आपल्या घरच्या मैदानात खेळत आहे. ही आफ्रिकेची जमेची बाजू आहे.

Icc W World Cup 2023 Final | ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप विजयाची हॅटट्रिक पूर्ण करणार?
Follow us on

न्यूलँड्स | क्रिकेट विश्वासाठी रविवार 25 फेब्रुवारी ही तारीख अतिशय महत्वाची आहे. रविवारी आयसीसी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप फायनल मॅच पार पडणार आहे. या महामुकाबल्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी अंतिम सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. ऑस्ट्रेलिया टी 20 वर्ल्ड कपमधील सर्वात यशस्वी टीम आहे. तर दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहचली आहे. त्यामुळे वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी उभयसंघात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

या सामन्याचं आयोजन हे केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया सर्वात यशस्वी टीम आहे. मात्र असं असलं तरी दक्षिण आफ्रिका आपल्या घरच्या मैदानात खेळत आहे. ही आफ्रिकेची जमेची बाजू आहे.

आपल्या टीमने अंतिम सामन्यात धडक मारलीय म्हटल्यावर दक्षिण आफ्रिकेचे चाहते सपोर्ट करण्यासाठी एकच गर्दी करतील. त्यामुळे आफ्रिकेला होम कंडीशनचा मोठा फायदा होणार आहे.

हे सुद्धा वाचा

दक्षिण आफ्रिकेसमोर मजबूत आव्हान

ऑस्ट्रेलियाची ही अंतिम फेरीत पोहचण्याची 7 वी वेळ आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने सलग 2 वेळा टी 20 वर्ल्ड कप उंचावला आहे. ऑस्ट्रेलियाने 2020 मध्ये टीम इंडिया आणि 2018 साली अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला यंदा वर्ल्ड कप जिंकून हॅटट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला आफ्रिकेसमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे.

त्यामुळे अनुभवी ऑस्ट्रेलिया बाजी मारणार, की घरच्या मैदानात आफ्रिका कारनामा करणार, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

इंग्लंड टीम | हीथर नाईट (कर्णधार), अलिस कॅप्से, डॅनी वॅट, मैया बाउचिर, सोफिया डुंकले, चार्ली डीन, डॅनियल गिब्सन, नॅट क्विअर, अमी जोन्स, लॉरेन विनफिल्ड हिल, फ्रेया डेविस, इस्सी वोंग, केट क्रॉस, कॅथरिन ब्रंट, लॉरेन बेल, सारा ग्लेन आणि सॉफि एक्सेलस्टोन.

टीम साऊथ आफ्रिका | सुने लूस (कॅप्टन), अन्नेरी डेर्कसन, लारा गुडाल, लॉरा व्होलवार्ट, अन्नेके बॉच, च्लोई ट्रायोन, डेलमारी टकर, मॅरिजेन कॅप्प, नदीन डि क्लर्क, सिनालो जाफ्ता, टाझमिन ब्रिट्स, अयाबोंगा खाका, मासबाटा क्लास, नोन्कुलुलेको म्लाबा आणि शबनिम इस्माईल.