नवी दिल्ली : पाकिस्तानच्या (Pakistan) क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याची (Babar Azam) इंग्रजीत (English) ‘ढ’ आहे. हे अगदी सर्वश्रूत आहे. त्याची भाषेवरील पकड कमकुवत असल्यानं त्याला अनेकदा टीकेचा सामना करावा लागतो. पण, तुम्ही जेव्हा एका मोठ्या पदावर असतात. देशाचं प्रतिनिधित्व करतात. तेव्हा तुम्हाला जागतिक पातळीवरील भाषा तरी नीट आली पाहिजे. आता बाबरची इंग्रजी किती कच्ची आहे. ते सगळ्या जगाला माहीत आहे. याचे एक छोटेसे उदाहरणही अलीकडे पाहायला मिळाले. नेदरलँड्सला गेलेल्या पाकिस्तान आणि यजमान संघ यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना 18 ऑगस्ट रोजी हेजलरवेग स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान संघाने 98 चेंडू शिल्लक असताना 7 विकेट्सने मोठा विजय मिळवला. प्रत्येक सामन्याप्रमाणे या सामन्यातही बाबरची बॅट चमकली आणि संघाच्या विजयात तारणहार ठरली. त्याने संघासाठी 87.69 च्या स्ट्राईक रेटने 65 चेंडूत 57 धावांची सुरेख अर्धशतकी खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सात उत्कृष्ट चौकार आले.
Even Sarfaraz used to speak better english than Babar Azam? pic.twitter.com/mvK4S701J3
हे सुद्धा वाचा— Vaibhav Ingale (@itzvri45) August 18, 2022
सामना संपल्यानंतर बक्षीस वितरण समारंभात झाला. यावेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला काही प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा त्याची जीभ इथेच गडबडलेली दिसून आली. बाबरच्या इंग्रजी भाषेवरील कमकुवत आकलनामुळे चाहत्यांना खिल्ली उडवणारा विषय मिळाला आणि मग काय. सोशल मीडियावर बाबरवर टीका सुरू झाली. कुणी खिल्ली उडवली तर कुणी बाबरा टोलाही लगावलाय.
Even i can speak better English than
Babar Azam.@babarazam258 #BabarAzam pic.twitter.com/p5UHxck1UE— Over Thinker Lawyer ?? (@Muja_kyu_Nikala) August 19, 2022
बाबर हा पहिला पाकिस्तानी खेळाडू नाही ज्याला इंग्रजीत घट्ट पकड आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक, सर्फराज अहमद यांसारख्या खेळाडूंचाही या भाषेत हातखंडा आहे. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर चेष्टेचा विषयही बनवावा लागला आहे. मात्र, काही भारतीय चाहत्यांसह जगभरातील क्रिकेटप्रेमी बाबरच्या मदतीला धावून आले आहेत आणि त्याला पाठिंबा देत आहेत.
Some jobless English professors are making fun of Babar’s English. You people go first and reach his level. You can speak better English but still no one knows you but the whole world knows Babar. That’s the actual level.? #BabarAzam? pic.twitter.com/eqjqP3oODv
— MUSKAN ?? (@Musskkaan) August 19, 2022
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नेदरलँड संघाने नाणेफेक जिंकून पाकिस्तान संघासमोर 44.1 षटकात 187 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य ग्रीन आर्मीने 33.4 षटकांत तीन गडी गमावून सहज गाठले. संघाकडून बाबर आझमशिवाय मोहम्मद रिझवानने नाबाद 69 आणि आगा सलमानने नाबाद 50 धावांची खेळी केली.