मुंबई : वर्ल्ड कप 2023 सुरू असताना पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा भूकंप झाला आहे. पाकिस्तान संघाचा खेळाडू बाबर आझम याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघ सेमी फायनलमध्ये जागा मिळवू शकली नव्हता. लीग स्टेजच्या नऊ सामन्यांमधील चार सामन्यातच पाकिस्तान संघाने विजय मिळवता आला होता. सुमार कामगिरीनंतर बाबरवर गेले काही दिवस टीका होत होती. अशातच बाबरने तडकाफडकी कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा विक्रम घेतला आहे.
— Babar Azam (@babarazam258) November 15, 2023
बाबर आझम याने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यावर त्याच्यावर आजी-माजी खेळाडूंनी टीका केली होती. भारतामध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाने खराब कमगिरी केली होती. अफगाणिस्तान संघाने त्यांना पराभूत केलं होतं, क्रिकट बोर्डातही सर्व काही आलबेल नसल्याची माहिती समजत आहे.
मला ती काळ आठवतो 2019 मध्ये पाकिस्तान संघाचं नेतृत्त्व करण्यासाठी फोन आला होता. गेल्या चार वर्षांमध्ये मैदानात आणि बाहेर अनके चढ उतार पाहिले आहेत. मी मनापासून पूर्ण समर्पण करत पाकिस्तानचा क्रिकेट जगतामध्ये नाव होईल हे ध्येय ठेवलं होतं.
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानी पोहोचण्यात खेळाडू प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापन सर्वांनी सामूहिक प्रयत्न केले. या प्रवासामध्ये चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांंचे आभार. आज मी तिन्ही फॉरमॅटमधील पाकिस्तानी संघाचे कर्णधारपद सोडत आहे. हा एक कठीण निर्णय आहे पण मला वाटते की हा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे. मी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळाडू म्हणून पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत राहिल. मला ही महत्त्वाची जबाबदारी दिल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचेही मनापासूवन आभार, अशी भावनिक पोस्ट बाबर आझमने केली आहे.
दरम्यान, आताच गेल्या काही दिवसांआधी पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यानेही आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्या पाठोपाठ आता बाबर आझमने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने आता पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा भूकंप झाला आहे.