सिल्हेट | बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. अफगाणिस्तानने सलग 2 सामने जिंकत मालिका खिशात घातली. तर तिसरा सामना जिंकत बांगलादेशने अफगाणिस्तानला क्लिन स्वीप देण्यापासून रोखलं. त्यामुळे अफगाणिस्तानने ही मालिका 2-1 ने जिंकली. त्यानंतर आता आज 14 जुलैपासून उभयसंघातील 2 सामन्यांच्या टी 20 मालिकेला सुरुवात झाली. बांगलादेशने या पहिल्या सामन्यात 2 विकेट्सने विजय मिळवत विजयी सलामी दिली. तसेच 1-0 ने मालिकेत आघाडी घेतली. मात्र बांगलादेशच्या विजयापेक्षाही अफगाणिस्तानच्या एका युवा 24 वर्षीय गोलंदाजीच चर्चा जास्त रंगलीय. कारण, या गोलंदाजाने हॅटट्रिक घेण्याची कामगिरी केलीय.
बांगलादेशने टॉस जिंकून अफगाणिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्ये 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 154 धावा केल्या. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी 155 धावांचं आव्हान मिळालं. बांगलादेशने हे विजयी आव्हान तॉहिद हृदॉय याच्या नाबाद 47 धावांच्या जोरावर 19.5 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मात्र अफगाणिस्तानने शेवटच्या बॉलपर्यंत कडवी झुंज दिली.
बांगलादेशने 19 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 149 धावा केल्या होत्या. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी अवघ्या 6 धावांची गरज होती. तॉहीद सेट असल्याने बांगलादेश सहज जिंकेल, असं वाटत होतं. शेवटची आणि निर्णायक ओव्हर करीम जनत टाकायला आला.
करीमच्या पहिल्याच बॉलवर तॉहिदसोबत असलेल्या मेहदी हसन मिराज याने फोर ठोकला. त्यामुळे आता विजयासाठी 5 बॉलमध्ये 2 धावा हव्या होत्या, पण गेम अजून बाकी होता. करीमने पुढच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर कारनामा केला. करीमने अनुक्रमे मेहदी हसन मिराज, तास्कीन अहमद आणि नसुम अहमद या तिघांना आऊट करत हॅटट्रिक घेतली. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला. आता बांगलादेशला विजयासाठी 2 बॉलमध्ये 2 धावांची गरज होती. तर अफगाणिस्तानलाही विजयासाठी 2 विकेट्स पाहिजे होत्या. मात्र शोरीफूल इस्लाम याने चौका ठोकून बांगलादेशला विजय मिळवून दिला. मात्र करीमच्या या हॅटट्रिकमुळे सामना चांगलाच रंगतदार झाला.
करीम जनत याची हॅटट्रिक
Karim Janat has taken a hat-trick! #BANvsAFG
— Vipin Tiwari (@vipintiwari952) July 14, 2023
करीम दुसराच गोलंदाज
Mehidy Hasan Miraz ☝
Taskin Ahmed ☝
Nasum Ahmed ☝Karim Janat takes just the second hat-trick by an Afghanistan player in T20Is ?#BANvAFG | 1st T20I: https://t.co/gxO75NjQBw pic.twitter.com/C08xkoh9sa
— ICC (@ICC) July 14, 2023
दरम्यान करीम अफगाणिस्तानसाठी टी 20 क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा एकूण दुसरा आणि पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. याआधी राशिद खान याने आयर्लंड विरुद्ध डेहरादून इथे 24 फेब्रुवारी 2019 रोजी तिसऱ्या टी 20 सामन्यात हॅटट्रिक घेतली होती. राशिदने 4 बॉलमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या. राशिदने 16 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर आणि 18 व्या ओव्हरमधील पहिल्या 3 बॉलवर विकेट्स घेतल्या होत्या.
बांगलादेश प्लेइंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन),लिटन दास (विकेटकीपर), रॉनी तालुकदार, नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदोय, शमीम हुसैन, मेहिदी हसन मिराज, तस्किन अहमद, नसुम अहमद, शरीफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान.
अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन |हमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर) झाई, इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला जद्रान, मोहम्मद नबी, करीम जनात, रशीद खान (कॅप्टन) नजीब उर रहमान, फरीद अहमद मलिक, अजमातुल्ला उमरझाई आणि फझलहक फारुकी.