ढाका | बांगलादेश क्रिकेट टीम विरुद्ध अफगाणिस्तान क्रिकेट टीम यांच्यात ढाकातील शेरे ए बांगला नॅशनल स्टेडियममध्ये एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावातही बांगालदेशच्या नजमूल शांतो याने शतक ठोकलंय. नजमूलने अशी कामगिरी करत कीर्तीमान रचलाय. नजमूल कसोटी क्रिकेटमधील दोन्ही डावांमध्ये शतक ठोकणारा बांगलादेशचा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी बांगलादेशकडून मोमिनुल हक याने 2018 मध्ये श्रीलंका विरुद्ध दोन्ही डावात शतक ठोकण्याचा कारनामा केला होता.
शांतोने अफगाणिस्तान विरुद्ध पहिल्या डावात 146 धावांची खेळी केली. तर आता बांगलादेशच्या दुसऱ्या डावातील फलंदाजीदरम्यान तिसऱ्या दिवशी 124 धावा केल्या. शांतोसाठी हा क्षण संस्मरणीय असा ठरला. कारण शांतोसोबत मोमिनुल हक खेळत होता.
नजमूल शांतो याने पहिल्या डावात 175 बॉलमध्ये 23 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने आणि 83.43 च्या स्ट्र्राईक रेटने 146 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात नजमूलने 151 चेंडूत 15 चौकारांसह 124 धावा केल्या. दुसऱ्या डावात नजमूलव्यतिरिक्त मोमिनूल हक यानेही शतक ठोकलं.
Najmul Hossain Shanto becomes the second Bangladesh batter to score a century in both innings of a Test match.?#BCB | #Cricket | #BANvAFG pic.twitter.com/FE8CGZCUnE
— Bangladesh Cricket (@BCBtigers) June 16, 2023
अफगाणिस्तानने टॉस जिंकून बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं. बांगलादेशने पहिल्या डावात 86 ओव्हरमध्ये ऑलआऊट 382 धावा केल्या. अफगाणिस्तानचा पहिला डाव 382 धावांच्या प्रत्युत्तरात अवघ्या 39 ओव्हरमध्ये 146 धावांवर ऑलआऊट झाला. थोडक्यात काय, तर पहिल्या डावात नजमूलने एकट्याने जितक्या धावा केल्या, तितक्याच धावात अफगाणिस्तानचा बाजार उठला. त्यामुळे बांगलादेशला दुसऱ्या डावात 236 धावांची मोठी आघाडी मिळाली.
Target set ?
Follow #BANvAFG live: https://t.co/xTMq0d9WtM pic.twitter.com/RNrNL4XoNn
— ICC (@ICC) June 16, 2023
बांगलादेशने आपल्या दुसऱ्या डावात 80 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 425 धावा केल्या. बांगलादेशने दुसरा डाव 425 धावांवर धाव घोषित केल्या. त्यामुळे आता अफगाणिस्तानला विजयासाठी 662 धावांचे आव्हान मिळाले आहे.
बांगलादेश प्लेइंग इलेव्हन | लिट्टन दास (कॅप्टन आणि विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो, झाकीर हसन, मोमिनुल हक, महमुदुल हसन जॉय, मुशफिकुर रहीम, मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम आणि इबादोत हुसेन.
अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झदरन, अब्दुल मलिक, रहमत शाह, नासिर जमाल, अफसर झझाई (विकेटकीपर), करीम जनात, अमीर हमजा, झहीर खान, निजत मसूद आणि यामिन अहमदझाई.