चट्टोग्राम | क्रिकेट विश्वात दररोज अनेक विक्रम होत असतात. तसेच ते ब्रेकही होत असतात. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने विशेष करुन युवा खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. बॉलिंग आणि बॅटिंगने युवा क्रिकेटपटू आपली छाप सोडत आहेत. अशाच एका अवघ्या 21 वर्षांच्या युवा फलंदाजांना धमाका केला आहे. या बॅट्समनने अवघ्या 21 बॉलमध्ये 100 धावा करणयाचा कारनामा केला आहे. त्यामुळे या क्रिकेटपटूची क्रीडा विश्वात एकच चर्चा रंगली आहे.
या क्रिकेटरने 125 बॉलमध्ये 145 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 8 सिक्स आणि 13 फोर ठोकले. क्रिकेटरने चौकारांच्या मदतीने 52 आणि 8 सिक्सच्या मदतीने 52 धावा केल्या. याचाच अर्थ फक्त 21 बॉलमध्ये 100 धावा पूर्ण केल्या. या युवा फलंदाजाचं नाव रहमानउल्ला गुरबाज आहे. रहमानउल्ला गुरबाज याने बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ही कामगिरी केली.
गुरबाज आणि इब्राहीम झद्रान या ओपनिंग जोडीने चमकदार कामगिरी करत रेकॉर्ड ब्रेक केला. गुरुबाज याने 22 ओव्हरमधील पहिल्या बॉलवर मेहदी हसन याच्या बॉलिंगवर एकेरी धाव घेतली. यासह अफगाणिस्तानचा स्कोअर 142 इतका झाला. यासह गुरुबाज आणि इब्राहीम या जोडीने अफगाणिस्ताकडून सर्वोच्च सलामी भागीदारीचा विक्रम मोडीत काढत इतिहास रचला. या दोघांनी साठी रेकॉर्ड ओपनिंग पार्टनरशीप केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 256 धावांची भागीदारी केली.
या विक्रमी भागीदारीदरम्यान गुरुबाज आणि इब्राहीम या दोघांनी शतकं पूर्ण केली. गुरुबाज याने 145 आणि इब्राहीम याने 100 धावांची शतकी खेळी. या दोघांच्या या सुपरफास्ट शतकी खेळीमुळे बांगलादेशला विजयासाठी 332 धावांचे आव्हान मिळाले.
रहमानुल्लाह गुरबाज याची प्रतिक्रिया
?: @RGurbaz_21 reacts to his 1️⃣4️⃣5️⃣!#AfghanAtalan | #BANvAFG2023 | #XBull pic.twitter.com/NyOXm54QBo
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) July 8, 2023
अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, नजीबुल्ला जद्रान, रशीद खान, फझलहक फारुकी, मुजीब उर रहमान, अजमातुल्ला उमरझाई आणि मोहम्मद सलीम साफी.
बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | लिटन दास (कर्णधार), मोहम्मद नईम, नजमुल हुसेन शांतो, शाकिब अल हसन, तौहिद हृदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराझ, हसन महमूद, इबादोत हुसेन आणि मुस्तफिजुर रहमान.