BAN vs AFG | बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात ‘गरमागरमी’, रहमत शाह-हसन महमुद भिडले

| Updated on: Sep 03, 2023 | 8:50 PM

Rahmat Shah and Hasan Mahmud Controversy | बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यनात फुल्ल राडा झाला. दोन्ही टीमचे खेळाडू आपसात भिडले. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानाचं कुस्तीच्या आखड्याचं रुपांतर झालं.

BAN vs AFG | बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात गरमागरमी, रहमत शाह-हसन महमुद भिडले
Follow us on

लाहोर | आशिया कप 2023 मधील चौथा सामना बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात खेळवण्यात येत आहे. बागंलादेशचा या स्पर्धेतील दुसरा तर अफगाणिस्तानचा पहिला सामना आहे. बांगलादेशने या सामन्यात टॉस जिंकला. बांगलादेशने अफगाणिस्तानला विजयासाठी 335 धावांचं आव्हान दिलं. बांगलादेशला पहिल्या सामन्यात श्रीलंकेला चीतपट केलं. त्यामुळे बांगलादेशसाठी अफगाणिस्तान विरुद्धचा ‘करो या मरो’ असा सामना आहे. बांगलादेश आणि अफगाणिस्तान या सामन्यात खेळाडूंमध्ये खडाजंगी झाली. दोन्ही टीमचे खेळाडू भिडले. त्यामुळे एकच जोरदार राडा झाला. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नक्की काय झालं?

अफगाणिस्तानचा बॅट्समन रहमत शाह आणि बांगलादेशचा बॉलर हसन अहमद यांच्यात झकाझकी झाली. हसन महमूद याने रहमतच्या दिशेने जोरात बॉल फेकून मारला. त्यामुळे एकच राडा झाला. त्यामुळे काही वेळ मैदानात गरमागरमी पाहायला मिळाली. हसन आणि रहमत यांच्यात घडलेला सर्व प्रसंगाचा व्हीडिओ आता व्हायरल झालाय. नक्की काय झालं ते आपण सविस्तर जाणून घेऊयात.

हे सुद्धा वाचा

अफगाणिस्तान 335 धावांच्या विजयी आव्हानसाठी मैदानात आली. बांगलादेशच्या शोरिफूल इस्लाम याने अफगाणिस्तानला दुसऱ्याच ओव्हरमध्ये पहिला झटका दिला. शोरिफूलने रहमानुल्लाह याला एलबीडबल्यू आऊट केलं. त्यानंतर रहमत शाह मैदानात आला. काही ओव्हर्सचा खेळ झाला. 6 ओव्हर्स पूर्ण झाल्या. त्यानंतर हसन महमुद अफगाणिस्तानच्या डावातील सातवी ओव्हर टाकायला आला.

बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात राडा


हसनने पहिला बॉल डॉट टाकला. हसनने दुसरा बॉल टाकला. रहमत शाह याने बॉलला बॅटने टच केला. रहमत मारलेला बॉल एक टप्पा घेऊन हसनच्या हातात गेला. हसनने रहमतला ठस्सन देत त्याच्या दिशेने बॉल फेकला. सुदैवाने रहमतला बॉल लागला नाही. मात्र रहमतने हसनच्या या कृतीविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली.

बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), मोहम्मद नईम, नजमूल हुसेन शांतो, तोहिद हृदाय, शमिम होसेन, मुशफिकर रहिम (विकेटीपर), अफीफ होसेन, मेहदी हसन मिराज, तास्किन अहमद, शोरिफूल इस्लाम आणि हसन महमुद

अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | हश्मतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरुबाझ (विकेटकीपर), इब्राहीम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी, गुलाबदीन नईब, करीम जनत, राशिद खान, फझलहक फारुकी आणि मुजीब उर रहमान.