BAN vs AFG 3rd Odi Live Streming | बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान तिसरा सामना, जाणून घ्या सर्वकाही

| Updated on: Jul 11, 2023 | 12:03 AM

Bangladesh vs Afghanistan 3rd Odi Live Streming | बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा सामना कधी आणि कुठे होणार जाणून घ्या.

BAN vs AFG 3rd Odi Live Streming | बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान तिसरा सामना, जाणून घ्या सर्वकाही
Follow us on

चट्टोग्राम | सलग 2 सामन्यात पराभूत झाल्यानंतर बांगलादेश मंगळवारी 11 जुलै रोजी एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात लाज राखण्यासाठी उतरेल. तर अफगाणिस्तान क्रिकेट टीमकडे बांगलादेशला त्यांच्याच घरात चारी मुंड्या चित करण्याची सुवर्णसंधी आहे. बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना हा झहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. अफगाणिस्तान 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे लाज आणि प्रतिष्ठेसाठी बांगलादेशला हा सामना जिंकावा लागणार आहे.

आकडेवारी कुणाच्या बाजूने?

बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 13 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. या मालिकेआधी आकड्यांच्या बाबतीत बांगलादेश वरचढ होती, अजूनही आहे. मात्र आता अफगाणिस्तानने बांगलादेशचा माज उतरवला आहे. आता 2 सामन्यांमधील विजयानंतर दोन्ही संघांमधील विजयाचं अंतर कमी झालं आहे. या 13 पैकी 7 सामन्यात बांगलादेशने विजय मिळवलाय. तर अफगाणिस्तान 6 वेळा विजयी झाली आहे.

हे सुद्धा वाचा

अफगाणिस्तानची जबर कामगिरी

सलग 2 सामने जिंकल्याने अफगाणिस्तानचा विश्वास चांगलाच दुणावलेला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांसह फलंदाजांनी धमाका केला. अफगाणिस्तानच्या सलामी जोडीने दुसऱ्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. गुरुबाज याने 125 बॉलमध्ये 13 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 145 धावांची खेळी केली. तर झद्रान याने 119 चेंडूत 100 धावा केल्या. त्यामुळे या जोडीकडून तिसऱ्या सामन्यातही अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

बांगलादेशला क्लिन स्वीप देण्यासाठी अफगाणिस्तान सज्ज

दरम्यान बांगलादेशला क्लिन स्वीप देण्यासाठी अफगाणिस्तानने चांगलीच कंबर कसली आहे. या तिसऱ्या सामन्याआधी अफगाणिस्तान क्रिकेट टीमने जोरदार सराव केला. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डच्या ट्विटर हँडलवरुन हे फोटो ट्विट करण्यात आले आहेत.

बांगलादेश क्रिकेट टीम | लिटॉन दास (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मोहम्मद नईम, नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदोय, शाकिब अल हसन, अफिफ हुसैन, मेहिदी हसन मिराझ, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, इबादोत हुसेन, तैजुल इस्लाम, तस्किन अहमद, रोनी तस्किन अहमद आणि शरीफुल इस्लाम.

अफगाणिस्तान क्रिकेट टीम | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झद्रान, रशीद खान, अजमातुल्ला ओमरझाई, मुजीब उर रहमान, फझलहक फारूकी, मोहम्मद सलीम साफी, रियाझ हसन, शाहिदुल्ला कमाल, इक्रम अकील, झिया-उर-रहमान, वफादर मोमंद, सय्यद शिरजाद आणि अब्दुल रहमान.