ODI Cricket | वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, कुणाला संधी कुणाला डच्चू?

| Updated on: Jun 17, 2023 | 5:08 PM

One Day Cricket Series | 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आलाय. टीममध्ये स्टार ऑलराउंडरची दुखापतीनंतर एन्ट्री झाली आहे.

ODI Cricket | वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, कुणाला संधी कुणाला डच्चू?
Follow us on

ढाका | क्रिकेट टीम इंडिया पुढील महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात अनुक्रमे टेस्ट, वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. टीम इंडियाच्या या दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून होणार आहे. त्याआधी 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेश क्रिकेट टीमने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

बांगलादेशने अफगाणिस्तानवर एकमेव कसोटी सामन्यात 546 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. कसोटी क्रिकेट इतिहासातील हा तिसरा सर्वात मोठा विजय ठरला. त्यानंतर आता बांगलादेश अफगाणिस्तान विरुद्ध वनडे सीरिजसाठी सज्ज आहे. वनडे सीरिजचं आयोजन जुलै महिन्यात करण्यात आलंय. तमीम इक्बाल अफगाणिस्तान विरुद्ध वनडे सीरिजमध्ये बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. या वनडे सीरिजला 5 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या तिन्ही सामन्यांचं आयोजन हे चिटगावमध्ये करण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा

शाकिबचं कमबॅक

तसेच या सीरिजसाठी स्टार आणि मॅचविनर ऑलराउंडर शाकिब अल हसन याचं दुखापतीनंतर कमबॅक झालंय. शाकिबला मे महिन्यात आयर्लंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेत बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे शाकिबला अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमेव टेस्ट मॅचलाही मुकावं लागलं होतं.

अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम बांगलादेश

तमीम इक्बाल (कॅप्टन), लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम, तौहीद हृदोय, मेहिदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, तस्किन अहमद, इबादोत हुसेन चौधरी, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शरीफुल इस्लाम, अफ्रीफ होसैन आणि नईम शेख.

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 5 जुलै, चिटगाव

दुसरा सामना, 8 जुलै, चिटगाव

तिसरा सामना, 11 जुलै, चिटगाव

दरम्यान या वनडे सीरिजनंतर बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात टी 20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही टी 20 मालिका असणार आहे. या मालिकेला 14 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तर 16 जुलैला दुसरा आणि अखेरचा सामना खेळवण्यात येणार आहे. अफगाणिस्तानच्या बांगलादेश दौऱ्याची सांगा या सामन्याने होणार आहे. या टी 20 सीरिजसाठी लवकरच संघ जाहीर करण्यात येणार आहे.

टी 20 मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, शुक्रवार 14 जुलै, सिल्हेट.

दुसरा सामना, रविवार 16 जुलै, सिल्हेट.