ढाका | वूमन्स टीम इंडियाचा शनिवारी बांगलादेश दौरा आटोपला. बांगलादेश विरुद्धचा तिसरा एकदिवसीय टाय झाला आणि त्यामुळे मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली. हा तिसऱ्या आणि अंतिम सामना ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने केलेली कृती तिला चांगलीच महागात पडू शकते. हरमनप्रीत हीने या सामन्यात पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली.
या सामन्यात नाहिदा अख्तर हीच्या बॉलिंगवर हरमनप्रीत कौर हीला अंपायरने कॅच आऊट घोषित केलं. मात्र हा निर्णय वादग्रस्त ठरला. रिप्ले पाहिल्यानंतर बॉल बॅटला न लागता पॅडला लागून स्लिपला असलेल्या फिल्डरच्या दिशेने गेल्यासारखं वाटतंय. मात्र अंपायरने बाद घोषित केल्याने हरमनने या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. हरमनने स्टंपवर बॅट मारली. तसेच अंपायरवरही नाराजी व्यक्त केली. रिपोर्ट्सनुसार, आता हरमनला ही कृती चांगलीच महागात पडू शकते.
व्हीडिओत पाहा हरमनप्रीत कौर हीने काय केलं?
Harmanpreet Kaur was not happy with the decision ?#HarmanpreetKaur #IndWvsBangW #INDvWI pic.twitter.com/ZyoQ3R3Thb
— Ajay Ahire (@Ajayahire_cric) July 22, 2023
रिपोर्ट्सनुसार, हरमनप्रीत कौर हीच्यावर दंडात्मक कारवाईसह बंदीचीही कारवाई केली जाऊ शकते. हरमनप्रीत कौर हीच्यावर 2 सामन्यांची बंदी घातली जाऊ शकते. हरमनप्रीतवर 2 सामन्यांची बंदी घातल्यास तिला एशियन गेम्समधील पहिल्या 2 सामन्यांना मुकावं लागेल. आयसीसीच्या नियमांनुसार, क्रिकेट साहित्याचा वापर हा चुकीच्या कामासाठी करु शकत नाहीत. इतकंच नाही, तर पंचांविरोधातील जाहीरपणे बोलताही येत नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये शुबमन गिल याने स्टोरीद्वारे आपला संताप व्यक्त केला होता. तेव्हा शुबमन याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.
वूमन्स बांगलादेश प्लेइंग इलेव्हन | निगार सुलताना (कॅप्टन आणि विकेटकीपर), शमीमा सुलताना, फरगाना हक, शोभना मोस्तारी, लता मंडल, रितू मोनी, राबेया खान, नाहिदा अक्टर, फहिमा खातून, सुलताना खातून आणि मारुफा अक्तर.
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, देविका वैद्य आणि मेघना सिंग.