ढाका | बांगलादेश विरुद्ध आयर्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना हा पावसामुळे अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे या मालिकेत बांगलादेश 1-0 ने आघाडीवर आहे. सातत्याने होत असलेल्या पावसामुळे खेळात व्यत्यय येत होता. अखेर प्रतिक्षेनंतर सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आयसीसी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. दरम्यान मलिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा 23 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.
या दुसऱ्या सामन्यात आयर्लंडने टॉस जिंकून बागंलादेशला बॅटिंगची संधी दिली. बांगलादेशने या संधीचं सोनं केलं. बांगलादेश टीमने 349 धावा ठोकल्या. बांगलादेशचा वनडे क्रिकेटमधील ही सर्वोच्च धावसंख्या साकारली. बांगलादेशने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 349 धावा ठोकल्या. बांगलादेशकडून कॅप्टन तमिम इक्बाल याने 23, लिटॉन दास याने 70, नजमुल शांतो 73, शाकिब अल हसन 17 आणि तॉहिद हृदाय याने 49 धावा केल्या. तॉहिदचं अर्धशतक अवघ्या 1 धावेने हुकलं. बांगलादेशकडून मुशफिकर रहीम याने सर्वाधिक 100 धावांची शतकी खेळी केली. या खेळीत 14 चौकार आणि 2 सिक्स खेचले.
दुसरा सामना अनिर्णित
Modhumoti Bank Limited ODI Series: Bangladesh vs Ireland: 2nd ODI
Match was Abandoned due to the Rain ?
Full Match Details: https://t.co/XF1l0IaG11#BCB | #Cricket | #BANvIRE pic.twitter.com/vE0HFFvCC4
— Bangladesh Cricket (@BCBtigers) March 20, 2023
आयर्लंडकडून ग्रॅहम ह्यूम याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर मार्क एडेअर आणि कर्टिस कॅम्फर या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. आयर्लंडला विजयासाठी 350 धावांचं आव्हान मिळालं. आयर्लंडला बॅटिंगच्या प्रतिक्षेत होती. मात्र पावसाच्या बॅटिंगने आयर्लंडच्या बॅटिंगची संधी घालावली आणि सामन्याचा निकालच लागला नाही.
दरम्यान बांगलादेशने फटकेबाजी केल्यानंतर आयर्लंड या विजयी आव्हानाचा कसा पाठलाग करते, हे पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. याआधी आयर्लंडने इंग्लंड विरुद्ध 2011 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये 300 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केलाय. तसेच अनेक उलटफेरही आयर्लंडने केलेत. त्यामुळे अशाच उलटफेरची किंबहुना झुंजार सामना पाहायला मिळेल, अशी अपेक्षा ही तिकीट काढून आलेल्या चाहत्यांना होती. मात्र पावसामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं. तसेच नाखूश होऊन स्टेडियममध्ये निघाले.
बांगलादेश प्लेइंग इलेव्हन | तमीम इक्बाल (कॅप्टन), लिटॉन दास, नजमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), शाकिब अल हसन, तौहीद हृदोय, यासिर अली, तस्किन अहमद, इबादोत हुसेन, नसुम अहमद आणि हसन महमूद.
आयर्लंड प्लेइंग इलेव्हन | अँड्रयू बालबर्नी (कर्णधार), स्टीफन डोहेनी, पॉल स्टर्लिंग, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (विकेटकीपर), कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, अँडी मॅकब्राईन, मार्क एडेअर, मॅथ्यू हम्फ्रे आणि ग्रॅहम ह्यूम.