ढाका | सर्वच क्रिकेट संघांसाठी 2023 हे वर्ष अत्यंत महत्वाचं आहे. एकदिवसीय वनडे वर्ल्ड कप अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यानुसार प्रत्येक टीम एकदिवसीय मालिकेकडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने रंगीत तालिमेच्या दृष्टीने पाहत आहे. बांगलादेश टीम गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहे. बांगालादेशने नुकतंच वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या इंग्लंडचा 3 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशा एकतर्फी फरकाने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आयर्लंड विरुद्धच्या 3 मॅचच्या सीरिजमधील पहिल्या सामन्यात 183 धावांनी धमाकेदार विजय मिळवला. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात बांगलादेशच्या अनुभवी आणि तोडफोड बॅट्समन मुशफिकुर रहीम याने कारनामा केला आहे.
आयर्लंडने टॉस जिंकून बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र बांगलादेशने या संधीचा फायदा घेतला. बांगलादेशने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 349 धावा ठोकल्या. बांगलादेशकडून कॅप्टन तमिम इक्बाल याने 23, लिटॉन दास याने 70, नजमुल शांतो 73, शाकिब अल हसन 17 आणि तॉहिद हृदाय याने 49 धावा केल्या. तॉहिदचं अर्धशतक अवघ्या 1 धावेने हुकलं.
बांगलादेशकडून मुशफिकर रहीम याने सर्वाधिक 100 धावांची शतकी खेळी केली. या खेळीत 14 चौकार आणि 2 सिक्स खेचले. या खेळीसह मुशफिकरने मोठा रेकॉर्ड केलाय.
मुशफिकुर याने आधी 33 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर मुशफिकर याने टॉप गिअर टाकत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. रहीमने पुढील 50 धावा या 27 चेंडूत पूर्ण केल्या. अशाप्रकारे रहीमने 60 बॉलमध्ये सेंच्युरी ठोकली. विशेष म्हणजे बांगलादेशच्या डावातील शेवटच्या बॉलवर एकेरी धाव घेत रहीमने हे शतक पूर्ण केलं. यासह रहीम हा बांगलादेशकडून वेगवान शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला.
मुशफिकुर रहीम याचा झंझावात
Mushfiqur Rahim 100 not out off 60 balls.
Fastest hundred in ODIs for Bangladesh.#BCB | #Cricket | #BANvIRE. pic.twitter.com/NtjZXAR7a5
— Bangladesh Cricket (@BCBtigers) March 20, 2023
मुशफिकुर याने शाकिब अल हसन याचा रेकॉर्ड ब्रेक केला. शाकिबने 13 वर्षांपूर्वी 63 बॉलमध्ये शतक ठोकलं. होतं. मात्र मुशफिकुरने शाकिबला पछाडलं. इतकंच नाही, तर मुशफिकुर याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7 हजार धावांचा टप्पा पार केला. मुशफिकुर यासह तमीम इकबाल आणि शाकिब यांच्यानंतरचा तिसरा बांगलादेशी फलंदाज ठरला.
बांगलादेश प्लेइंग इलेव्हन | तमीम इक्बाल (कॅप्टन), लिटॉन दास, नजमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), शाकिब अल हसन, तौहीद हृदोय, यासिर अली, तस्किन अहमद, इबादोत हुसेन, नसुम अहमद आणि हसन महमूद.
आयर्लंड प्लेइंग इलेव्हन | अँड्रयू बालबर्नी (कर्णधार), स्टीफन डोहेनी, पॉल स्टर्लिंग, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (विकेटकीपर), कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, अँडी मॅकब्राईन, मार्क एडेअर, मॅथ्यू हम्फ्रे आणि ग्रॅहम ह्यूम.