BAN vs NED: शाकिब अल हसनची अर्धशतकी खेळी, नेदरलँड्समोर 160 धावांचं आव्हान

| Updated on: Jun 13, 2024 | 10:43 PM

Bangladesh vs Netherlands 1st Innings Highlights: बांगलादेशने नेदरलँड्समोर विजयासाठी 160 धावांचं आव्हान ठेवलं आहे. कोण जिंकणार सामना?

BAN vs NED:  शाकिब अल हसनची अर्धशतकी खेळी, नेदरलँड्समोर 160 धावांचं आव्हान
shakib al hasan bangladesh
Image Credit source: Icc X account
Follow us on

बांगलादेश क्रिकेट टीमने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात नेदरलँड्सला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं आहे. बांगलादेशने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. बांगलादेशकडून ऑलराउंडर शाकिह अल हसन याने अर्धशतकी खेळी केली. तर तांझिद हसन, महमदुल्लाह आणि जाकेर अली या तिघांनी छोटेखानी पण महत्त्वाची खेळी केली. त्यामुळे बांगलादेशला 150 पार मजल मारता आली. आता नेदरलँड्सला विजयासाठी 8च्या रनरेटने धावा कराव्या लागणार आहेत.

शाकिब अल हसन याने 46 बॉलमध्ये 9 चौकारांच्या मदतीने 64 धावांची खेळी केली. शाकिबने ऑक्टोबर 2022 नंतर पहिलं अर्धशतक झळकावलं. ओपनर तांझिद हसन याने 26 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 5 चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. नजमुल हुसैन शांतो आणि लिटॉस दास या दोघांनी 1-1 धाव केली. तर तॉहिद हृदॉयने 9 धावा जोडल्या. तर अखेरच्या क्षणी महमदुल्लाह आणि जाकेर अली या दोघांनी 25 आणि 14 धावा केल्या. तर नेदरलँड्सकडून आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन या दोघांनी 1-1 विकेट घेतली. तर टीम प्रिंगल याच्या खात्यात 1 विकेट गेली.

नेदरलँड्स इतिहास रचणार?

दरम्यान बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स यांच्यातील हा टी 20 वर्ल्ड कपमधील तिसरा सामना आहे. बांगलादेशने याआधीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. तर नेदरलँड्सला विजय मिळवता आलेला नाही. दोन्ही संघांसाठी हा सामना सुपर 8 च्या हिशोबाने अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे नेदरलँड्सने हा सामना जिंकल्यास त्यांचा बांगलादेश विरुद्ध टी 20 वर्ल्ड कपमधील पहिला विजय ठरेल. त्यामुळे या सामन्याच्या निकालाकडे सर्वांचच लक्ष असणार आहे.

शाकिबची अर्धशतकी खेळी

नेदरलँड्स प्लेइंग ईलेव्हन : स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), मायकेल लेविट, मॅक्स ओडोड, विक्रमजीत सिंग, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, लोगान व्हॅन बीक, टिम प्रिंगल, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन आणि विव्हियन किंगमा.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तांझिद हसन, लिटन दास (विकेटकीपर), शकीब अल हसन, तॉहिद हृदॉय, महमुदुल्ला, जाकेर अली, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.