मुंबई : बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेत बांगलादेशने 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यातील ट्वीस्टमुळे न्यूझीलंडचं टेन्शन वाढलं आहे. पहिल्या सामन्यातील पराभवामुळे दुसऱ्या सामन्यात कमबॅक करण्याची न्यूझीलंडसमोर संधी होती. पण 11 षटकांचा खेळ झाला आणि सामना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे बांगलादेशला फायदा झाला आहे. तर न्यूझीलंडला तिसऱ्या सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचं आव्हान असणार आहे. पावसामुळे बांगलादेशचं खऱ्या अर्थाने फायदा झाला असंच म्हणावं लागेल. तसेच विदेशी भूमीवर पहिल्यांदा टी20 मालिका जिंकण्याचं स्वप्नही पूर्ण होऊ शकतं. आता तिसऱ्या टी20 सामन्यात बांगलादेश कशी कामगिरी करतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे. पण न्यूझीलंड बांगलादेशला सहजासहजी विजयी मिळवून देईल असं वाटत नाही. दुसऱ्या टी20 सामन्यात बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
दुसऱ्या षटकातच न्यूझीलंडला फिन एलनच्या रुपाने धक्का बसला. शोरिफुल इस्लामने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 5 चेंडूत 2 धावा केल्या होत्या. त्यानंतर टिम सेफर्ट आणि डेरिल मिचेलने डाव सावरला. टिम सेफर्ट 23 चेंडूत 43 धावा करून तंबूत परतला. तान्झिम हसन साकिबच्या गोलंदाजीवर नजमुल होसेनने त्याचा झेल घेतला. तर खेळ रद्द होण्यापूर्वी डेरिल मिचेल नबाद 18 आणि ग्लेन फिलिप्स नाबाद 9 धावांवर खेळत होता.
स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता पावसाने हजेरी लावली. तेव्हा 11 षटकात न्यूझीलंडची 2 बाद 72 अशी स्थिती होती. त्यानंतर 5 षटकांच्या खेळाची कट ऑफ वेळ रात्री 10 वाजून 28 मिनिटांनी निश्चित करण्यात आली. पण पावसाचा जोर कमी झाला नाही आणि पंचांकडून रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी खेळ रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. तिसर्या आणि शेवटच्या टी20 साठी दोन्ही संघ आता नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला याच ठिकाणी भेटतील.
The second #NZvBAN T20I has been called off due to inclement weather 🌧 pic.twitter.com/RtBDlouqC0
— ICC (@ICC) December 29, 2023
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): फिन एलन, टिम सेफर्ट (विकेटकीपर), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिचेल सॅन्टनर (कर्णधार), एडम मिल्ने, टीम साऊदी, ईश सोढी, बेन सियर्स.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): सौम्या सरकार, रॉनी तालुकदार (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शमीम हुसेन, तौहीद हृदयॉय, अफिफ हुसैन, महेदी हसन, तनझिम हसन साकिब, शोरीफुल इस्लाम, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान