BAN vs NZ 2nd Test | एकही बॉल न टाकता दुसऱ्या दिवसाचा खेळ कसा संपला?

| Updated on: Dec 07, 2023 | 3:22 PM

Bangladesh vs New Zealand 2nd Test | बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीचा भाग आहे. त्यामुळे दनोन्ही संघांसाठी ही मालिका अतिशय महत्त्वाची आहे.

BAN vs NZ 2nd Test | एकही बॉल न टाकता दुसऱ्या दिवसाचा खेळ कसा संपला?
Follow us on

ढाका | बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड उभयसंघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला 6 डिसेंबरपासून सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी गोलंदाजांचा अपेक्षेप्रमाणे दबदबा पाहायला मिळाला. पहिल्या दिवशी एकूण 15 विकेट्स पडल्या. न्यूझीलंड ऑलआऊट केल्यानंतर बांगलादेशने किवींना 5 धक्के देत सामन्यात कमबॅक केलं. त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना दुसऱ्या दिवसाच्या खेळाची प्रतिक्षा होती. मात्र दुसऱ्या दिवशी क्रिकेट चाहत्यांच्या पदरी निराशा पडली. दुसऱ्या दिवसातील खेळ हा एकही बॉलशिवाय संपला, मात्र असं नक्की काय झालं असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. आपण सविस्तर जाणून घेऊयात.

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचं आयोजन हे राजधानी ढाक्यातील शेरे ए बांगला स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्यातील पूर्ण दुसरा दिवस हा पावसामुळे एकही बॉल न टाकता संपला. आयसीसी, बांगलादेश आणि न्यूझीलंड क्रिकेट टीमकडून सोशल मीडियाद्वारे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्याचं जाहीर केलं. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा झाली. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना आता सामना पाहण्यासाठी तिसऱ्या दिवसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ

पहिल्या दिवशी काय काय झालं ते आपण जाणून घेऊयात. बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र न्यूझीलंड्या बॉलिंगसमोर बांगला टायगर्स फेल झाले. बांगलादेशचा पहिला डाव हा 66.2 ओव्हरमध्ये 172 धावांवर आटोपला. बांगलादेशकडून मुशफिकुर रहीम याने सर्वाधिक 35 धावा केल्या. तर न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर आणि ग्लेन फिलीप्स या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेत बांगलादेशचं कंबरडं मोडलं. त्यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या न्यूझीलंडचीही अशीच स्थिती झाली. बांगलादेशने न्यूझीलंडला पहिल्या दिवसअखेर एकूण 5 धक्के दिले.

न्यूझीलंडचे दिग्गज फलंदाज हे फ्लॉप ठरले. त्यामुळे न्यूझीलंडची स्थिती 11.4 ओव्हरमध्ये 5 बाद 46 अशी झाली. त्यानंतर डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलीप्स या दोघांनी दिवसअखेर नाबाद 12 आणि 5 धावा केल्या. न्यूझीलंडचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला तोवर 12.4 ओव्हरमध्ये 5 बाद 55 असा स्कोअर झालेला आहे. न्यूझीलंड अजून 117 धावांनी पिछाडीवर आहे.

दुसऱ्या दिवसावर ‘पाणी’

दरम्यान बांगलादेश या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. बांगलादेशने पहिला सामना हा 150 धावांनी जिंकून मालिकेत आघाडी घेतलीय. त्यामुळे न्यूझीलंडसाठी हा दुसरा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे आता तिसऱ्या दिवसाच्या खेळाकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शहादत हुसेन, मेहदी हसन मिराझ, नुरुल हसन (विकेटकीपर), नईम हसन, तैजुल इस्लाम आणि शरीफुल इस्लाम.

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टिम साउथी (कॅप्टन), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, हेन्री निकोल्स, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, काइल जेमिसन आणि एजाज पटेल.