BAN vs NZ 2nd Test | न्यूझीलंडसाठी करो या मरो, बांगलादेश विरुद्ध बुधवारपासून सामना

| Updated on: Dec 05, 2023 | 9:36 PM

Bangladesh vs New Zealand 2nd Test | क्रिकेट चाहत्यांना बुधवार 6 डिसेंबरपासून अनेक सामन्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात वनडे आणि वूमन्स इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी 20 सामना होणार आहे. तसेच बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

BAN vs NZ 2nd Test | न्यूझीलंडसाठी करो या मरो, बांगलादेश विरुद्ध बुधवारपासून सामना
Follow us on

ढाका | न्यूझीलंड क्रिकेट टीम सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर गेली आहे. एकूण 2 सामन्यांची मालिकेत यजमान बांगलादेश 1-0 ने आघाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना हा 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात आला. बांगलादेशने हा सामना 150 धावांनी जिंकत मालिकेत विजयी सलामी दिली. बांगलादेशने या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. तर बांगलादेशच्या विजयामुळे टीम इंडियाची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. तसेच न्यूझीलंडलाही पराभवामुळे फटका बसला. आता न्यूझीलंडचा दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे. हा दुसरा सामना कुठे होणार हे जाणून घेऊयात.

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना केव्हा?

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्याला बुधवार 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना कुठे खेळवण्यात येणार?

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना हा शेरे बांगला स्टेडियम ढाका येथे खेळवण्यात येणार आहे.

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 9 वाजता टॉस होईल.

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना कुठे पाहता येईल?

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना हा फॅनकोड एपवर पाहायला मिळेल.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 2001 पासून ते आतापर्यंत एकूण 18 सामने खेळवण्यात आले आहेत. या 18 पैकी 2 सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने 13 सामन्यात विजय मिळवला. तर 3 सामन्यांचा निकाल लागला नाही.

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने

बांगलादेश क्रिकेट टीम | नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शहादत हुसैन, मेहदी हसन मिराझ, नुरुल हसन (विकेटकीपर), नईम हसन, तैजुल इस्लाम, शोरीफुल इस्लाम, खालिद अहमद, हसन महमूद , शादमान इस्लाम आणि हसन मुराद.

न्यूझीलंड टीम | टिम साउथी (कॅप्टन), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, काइल जेमिसन, ईश सोधी, एजाज पटेल, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, विल यंग आणि नील वॅगनर.