BAN vs PAK : बांगलादेशकडून कसोटीत पराभव होताच कर्णधार शान मसूद भडकला, म्हणाला..

| Updated on: Sep 03, 2024 | 4:20 PM

बांगलादेशने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. बलाढ्य समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर पराभूत केलं आहे. नुसतं पराभूत केलं नाही तर व्हाईटवॉश दिला आहे. यामुळे पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद चांगलाच संतापला आहे.

BAN vs PAK : बांगलादेशकडून कसोटीत पराभव होताच कर्णधार शान मसूद भडकला, म्हणाला..
Follow us on

बांगलादेशने कसोटी मालिकेत पाकिस्तानचा 2-0 ने धुव्वा उडवला. दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकत पाकिस्तानला व्हाईटवॉश दिला. यामुळे दिग्गज संघांचे धाबे दणाणले आहेत. बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्याच धरतीवर पराभवाची धूळ चारली. त्यामुळे क्रीडातज्ज्ञही आवाक् झाले आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला 10 गडी राखून पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात 6 गडी राखून नमवलं. त्यामुळे पाकिस्तानची देशातच नाचक्की झाली आहे. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या बांगलादेशने पराभूत केल्याने सोशल मीडियावर पाकिस्तानी खेळाडूंवर टीकेची झोड उठली आहे.  या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदही संतापलेला दिसला. त्याने या पराभवाचं विश्लेषण करताना सुरुवातीलाच निराशा व्यक्ती केली. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद म्हणाला की, ‘खूपच निराश आहे. आमच्या देशात कसोटी मालिका असल्याने उत्साहित होतो. ऑस्ट्रेलियाच्या बाबतीतही असंच झालं. आम्ही चुकांमधून काहीच शिकलो नाहीत. मला वाटते आम्ही ऑस्ट्रेलियात चांगला क्रिकेट खेळलो पण आमची भूमिका बजावली नाही. आम्हाला यावर काम करण्याची गरजआहे. असं माझ्या कार्यकाळात चौथ्यांदा घडलं आहे. जेव्हा वर्चस्व गाजवत होतो तेव्हाच आम्ही संघाला स्पर्धेत ढकललं. ‘

“मला वाटते की कसोटी क्रिकेट फिटनेसशिवाय बरंच काही सांगते. आम्ही पहिल्या कसोटीत चार वेगवान गोलंदाज खेळवले. कारण तीन गोलंदाजांवर ताण जास्त असेल असं वाटलं होतं. या सामन्यात आम्हाला त्याची उणीव जाणवली की आम्ही प्रत्येक डावात एक गोलंदाज गमावला. मला वाटते की या कसोटीतही आम्हाला तीन गोलंदाज आणि 2 फिरकीपटू कमी होते.”, असं शान मसूदने पुढे सांगितलं.

“पहिल्या डावात 274 ही धावसंख्या चांगली होती. मी आणि सईमने पहिल्या डावात लिटनसारख्या जास्त धावा करणं गरजेचं होतं. आम्हाला त्यांना 26/6 वर ठेवण्यापेक्षा चांगले केले पाहिजे. ही एक अशी गोष्ट आहे की त्यावर आम्ही आधीक काम करण्याची गरज आहे. या मालिकेतील पराभवामुळे निराश होण्याची गरज नाही.”, असंही शान मसूद पुढे म्हणाला.

“आम्ही शाहीन आणि नसीमला पुन्हा संघात आणले आहे. शाहीन एक वर्ष सातत्याने सर्व फॉरमॅटमध्ये खेळला आहे आणि आम्ही त्यावर कायम अवलंबून राहू शकत नाही. पण आपल्याला अधिक तंदुरुस्त आणि चांगली तयारी करण्याची गरज आहे.आता एक कसोटी आणि देशांतर्गत हंगाम असणार आहे आणि आम्हाला इंग्लंडसाठी चांगली तयारी करावी लागेल.”,  अशीही सारवासारव शान मसूदने पुढे केली.