टीम इंडियाने बांगलादेशचा नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत 2-0 अशा फरकाने धुळ चारली. त्यानतंर आता बांगलादेश मायदेशात दक्षिण आफ्रेकिविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. उभयसंघात एकूण 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. सलामीचा सामना हा 21 ऑक्टोबरपासून ढाका येथील शेरे बांगला स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याच्या काही तासांआधी बांगलादेशच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेशचा अनुभवी ऑलराउंडर शाकिब अल हसन हा या सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.त्यामुळे शाकिबच्या जागी कुणाला संधी दिली गेली? याची माहिती कर्णधार नजमुल हुसैन शांतो याने दिली आहे.
शाकिबने भारत दौऱ्यात तडकाफडकी टी20I क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तसेच ढाक्यात सुरक्षा दिल्यास तिथे अखेरचा कसोटी सामना खेळणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार शाकिबचा पहिल्या सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला होता. मात्र शाकिबला वाढत्या विरोधामुळे तो पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शाकिबवर एका प्रकरणात गु्न्ह्याची नोंद आहे. यामुळेच शाकिबचा विरोध केला जात आहे. त्यामुळे शाकिब पहिल्या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे शाकिब मायदेशात निरोपाचा सामना न खेळताच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.
आता शाकिबच्या जागी पहिल्या कसोटीत कुणाला संधी मिळणार? याबाबत कर्णधार नजमुल हुसैन शांतो याने माहिती दिली आहे. शाकिबच्या जागी मेहदी हसन मिराज याला संधी मिळू शकते, अशी माहिती शांतोने दिली आहे.
बांगलादेश दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कॅप्टन), डेविड बेडिंघम, मॅथ्यू ब्रीट्जके, डेवाल्ड ब्रेव्हीस, टोनी डी झॉर्जी, केशव महाराज, एडन मार्करम (पहिल्या कसोटीसाठी कर्णधार), वियान मुल्डर, सेनुरन मुथुसामी, लुंगी एन्गिडी, डेन पॅटर्सन, डेन पिएड्ट, कगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, रयान रिकेल्टन (विकेटकीपर) आणि कायल वेरिन (विकेटकीपर).
पहिल्या कसोटीसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसैन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, महमुदुल हसन जॉय, जाकिर हसन, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, लिट्टन दास, झाकेर अली, मेहदी हसन, तैजुल इस्लाम, नईम हसन, तस्कीन अहमद, मेहदी हसन मिराज, हसन महमूद आणि नाहिद राणा.