BAN vs SA : सोमवारपासून बांगलादेश-दक्षिण आफ्रिका पहिला सामना, कुठे पाहता येणार?

| Updated on: Oct 20, 2024 | 5:58 PM

Bangladesh vs South Africa 1st Test : बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सोमवार 21 ऑक्टोबरपासून कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येणार आहे.

BAN vs SA : सोमवारपासून बांगलादेश-दक्षिण आफ्रिका पहिला सामना, कुठे पाहता येणार?
ban vs sa 1st test
Image Credit source: bangladesh cricket x account
Follow us on

बांगलादेशने पाकिस्तान दौऱ्यात शेजाऱ्यांना कसोटी मालिकेत 2-0 ने व्हाईटवॉश दिला. मात्र त्यानंतर बांगलादेशला भारत दौऱ्यात व्हाईटवॉशचा सामना करावा लागला. टीम इंडियाने बांगलादेशला 2-0 ने लोळवलं. त्यानंतर आता बांगलादेश मायदेशात पुन्हा एकदा कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. बांगलादेश दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला सोमवार 21 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. नजमुल हुसैन शांतो बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. तर टेम्बा बावुमा याच्या अनुपस्थितीत सलामीच्या सामन्यात एडन मारक्रम दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 14 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिका बांगलादेशवर वरचढ राहिली आहे. आफ्रिकेने बांगलादेशला 12 सामन्यात पराभूत केलं आहे. तर 2 सामने बरोबरीत राहिले आहेत. बांगलादेशला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदाही जिंकता आलेलं नाही. त्यामुळे बांगलादेश आपल्या घरात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयाचं खातं उघडणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

सामना कुठे पाहता येणार?

बांगलादेश-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेचं प्रक्षेपण भारतात करण्यात येणार नसल्याने टीव्हीवर सामना पाहता येणार नाही. मात्र मोबाईलवर फॅनकोड एपद्वारे सामना पाहता येईल.

सोमवारपासून बांगलादेश-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका

बांगलादेश दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कॅप्टन), डेविड बेडिंघम, मॅथ्यू ब्रीट्जके, डेवाल्ड ब्रेव्हीस, टोनी डी झॉर्जी, केशव महाराज, एडन मार्करम (पहिल्या कसोटीसाठी कर्णधार), वियान मुल्डर, सेनुरन मुथुसामी, लुंगी एन्गिडी, डेन पॅटर्सन, डेन पिएड्ट, कगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, रयान रिकेल्टन (विकेटकीपर) आणि कायल वेरिन (विकेटकीपर).

पहिल्या कसोटीसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसैन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, महमुदुल हसन जॉय, जाकिर हसन, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, लिट्टन दास, झाकेर अली, मेहदी हसन, तैजुल इस्लाम, नईम हसन, तस्कीन अहमद, मेहदी हसन मिराज, हसन महमूद आणि नाहिद राणा.