BAN vs SA, 2nd Test : पहिला दिवस दक्षिण अफ्रिकेचा, बांगलादेशला जॉर्झी-स्टब्सची शतकी दणका

| Updated on: Oct 29, 2024 | 5:36 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साखळीत बांग्लादेश आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. मालिकेत दक्षिण अफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी आहे. तसेच अंतिम फेरीचं गणितही सोपं होणार आहे.

BAN vs SA, 2nd Test : पहिला दिवस दक्षिण अफ्रिकेचा, बांगलादेशला जॉर्झी-स्टब्सची शतकी दणका
Image Credit source: Twitter
Follow us on

बांग्लादेश आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांनी गाजवला. दक्षिण अफ्रिकेने पहिल्या दिवशी 2 गडी बाद 307 धावा केल्या आहेत. टॉनी डी जॉर्झी नाबाद 141 आणि डेविड बेडिंघम नाबाद 18 धावांवर खेळत आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला मागे ढकललं आहे. दक्षिण अफ्रिकेला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याची संधी आहे. 450 पार धावसंख्या केली तर बांग्लादेश अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे हा सामना पहिल्याच दिवशी दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात झुकलेला आहे. दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकताच कर्णधार मार्करमने सांगितलं होतं की, ‘आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करू. चांगली खेळपट्टी दिसत हे. या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभारू. आमच्या आघाडीच्या सहा फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारायची आहे. आशा आहे की आम्ही मोठी धावसंख्या उभारू.’ असं मार्करमने सामना सुरु होण्यापूर्वी सांगितलं होतं. संघाची धावसंख्या पाहता झालंही तसंच

एडन मार्करम आणि टॉनी जॉर्झी या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 69 धावांची भागीदारी केली. त्यानंतर तैजुल इस्लामच्या गोलंदाजीवर एडन मार्करम 33 धावा करून बाद झाला. टॉनी आणि ट्रिस्टन स्टब्स या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी बांगलादेशच्या गोलंदाजांचा घाम काढला. दुसऱ्या विकेटसाठी या दोघांनी 201 धावांची भागीदारी केली. दरम्यान ट्रिस्टन स्टब्स 198 चेंडूचा सामना करून 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 106 धावा करून बाद झाला. तैजुल इस्लामने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर टॉनी आणि डेविड बेडिंघम या जोडीने बांगलादेशची डोकेदुखी वाढली. पहिल्या दिवसअखेर या जोडीने 37 धावांची भागीदारी केली. यात टॉनीने 211 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 141 धावा केल्या. तर डेविडने 25 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 18 केल्या आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): महमुदुल हसन जॉय, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मुशफिकुर रहीम, महिदुल इस्लाम अंकन (विकेटकीपर), झाकीर हसन, मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद, नाहिद राणा.

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम (कर्णधार), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, रायन रिकेल्टन, काइल वेरेन (विकेटकीपर), सेनुरान मुथुसामी, विआन मुल्डर, केशव महाराज, कागिसो रबाडा, डेन पॅटरसन.