दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिका या दौऱ्यात बांगलादेश विरुद्ध 2 सामन्यांची मालिका खेळत आहे. दक्षिण आफ्रिकने ढाक्यात झालेल्या सलामीच्या सामन्यात बांगलादेशवर 7 विकेट्सने विजय मिळवला होता. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. यासह दक्षिण आफ्रिकेची तब्बल 10 वर्षांनी आशिया खंडात कसोटी सामना जिंकण्याची प्रतिक्षा संपली. आता दक्षिण आफ्रिका दुसरा आणि अंतिम सामना जिंकून बांगलादेशला व्हाईटवॉश करण्यासाठी सज्ज आहे. दुसरा सामना हा 29 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान झहुर अहमद चौधरी स्टेडियम, चट्टोग्राम येथे खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका लागला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा नियमित कर्णधार टेम्बा बावुमा याला दुखापतीमुळे दुसऱ्या आणि अंतिम सामन्यालाही दुखापतीमुळे मुकावं लागलं आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी हा मोठा झटका आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाकडून याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन देण्यात आली आहे. त्यामुळे या अंतिम सामन्यातही टेम्बाच्या अनुपस्थितीत एडन मार्करम हाच दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे.
टेम्बा बावुमा याला डाव्या कोपऱ्याच्या दुखापतीमुळे या दुसऱ्या सामन्यातही खेळता येणार नाही. टेम्बा या दुखापतीतून पूर्ण पणे फिट होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. टेम्बाला आयर्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ही दुखापत झाली होती. तेव्हापासून टेम्बा मैदानापासून दूर आहे. तसेच टेम्बाला त्याच ठिकाणी 2 वर्षांआधी भारत दौऱ्यावर असताना राजकोटमध्ये झालेल्या टी 20i सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे ही दुखापत आणखी डोकेदुखी ठरली आहे.
ए़डन मार्करम कॅप्टन
PLAYER UPDATE 📰🏏
Proteas Men’s Test captain Temba Bavuma has been ruled out of the second Test against Bangladesh as he continues his recovery from a left elbow injury.
While the right-hander has made significant progress in his rehabilitation, he will not be match-ready… pic.twitter.com/mlugDv6MMO
— Proteas Men (@ProteasMenCSA) October 25, 2024
दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), डेविड बेडिंघम, मॅथ्यू ब्रीट्जके, डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी जोरजी, केशव महाराज, वियान मुल्डर, सेनुरन मुथुसामी, लुंगी एनगिडी, डेन पॅटर्सन, डेन पिड्ट, कगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, रियान रिकेल्टन आणि कायल वेरिन.