BAN vs SL | बांगलादेशचा श्रीलंकेवर धमाकेदार विजय, मालिकेत बरोबरी

| Updated on: Mar 06, 2024 | 9:58 PM

Bangladesh vs Sri Lanka 2nd T20I Result | बांगलादेशची मालिकेतील सुरुवात पराभवाने झाली. मात्र बांगलादेशने दुसऱ्या सामन्यातून कमबॅक करत श्रीलंकेवर 8 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवत मालिकेत 1-1ने बरोबरी केली.

BAN vs SL | बांगलादेशचा श्रीलंकेवर धमाकेदार विजय, मालिकेत बरोबरी
Follow us on

सिल्हेट | बांगलादेश क्रिकेट टीमने श्रीलंकेवर दुसऱ्या टी 20 सामन्यात 8 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. श्रीलंकेने विजयासाठी दिलेलं 166 धावांचं आव्हान बांगलादेशने 11 बॉल राखून 18.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. बांगलादेशने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत विजयाचं खातं उघडलं. इतकंच नाही तर बांगलादेशने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. कॅप्टन नजमूल शांतो हा बांगलादेशच्या विजयाचा नायक ठरला. तर तॉहिद हृदॉय याने शांतोला चांगली साथ दिली.

बांगलादेशची बॅटिंग

बांगलादेशकडून नजमूल शांतो याने सर्वाधिक धावा केल्या. नजमूलने 38 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर तॉहिद हृदॉय याने 25 बॉलमध्ये 2 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 32 रन्स केल्या. तर त्याआधी लिटॉन दास याने 36 आणि सौम्य सरकारने याने 26 धावांचं योगदान देत बांगलादेशला आश्वासक सुरुवात करुन देण्यात निर्णायक भूमिका बजावली. श्रीलंकेकडून मथीशा पथीराणा याने दोन्ही विकेट घेतल्या. मात्र इतर गोलंदाज अपयशी ठरले.

त्याआधी बांगलादेशने टॉस जिंकून श्रीलंकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. सदीरा समरविक्रमा 7 आणि अविष्का फर्नांडो 0 या दोघांचा अपवाद वगळता श्रीलंकेच्या प्रत्येक फलंदाजाने 20-30 पेक्षा अधिक धावा केल्या. मात्र एकालाही मोठी खेळी करचा आली नाही. एंजलो मॅथ्यूज 32* आणि शनाका नाबाद 20 या जोडीने अखेरीस केलेल्या खेळीमुळे श्रीलंकेला 160 पार मजल मारता आली. श्रीलंकेने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 165 धावा केल्या. तर बांगलादेशकडून तास्किन अहमद, मेहदी अहमद, मुस्तफिजूर आणि सौम्य सरकार या चौघांनी 1-1 विकेट घेतली.

बांगलादेशचा धमाकेदार विजय

दरम्यान या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना हा 9 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. मालिका बरोबरीत असल्याने दोन्ही संघांचा तिसरा सामना जिंकून मालिका विजयाचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चांगलीच चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटॉन दास (विकेटकीपर), सौम्या सरकार, तौहीद ह्रदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, महेदी हसन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम आणि रिशाद हुसेन.

श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | चारिथ असालंका (कर्णधार), अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, एंजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, महेश तीक्षना, दिलशान मदुशंका, बिनुरा फर्नांडो आणि मथीशा पाथीराना.