मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील 54 वा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 192 धावा केल्या. हैदराबादसमोर 193 धावांचं ठेवलं होतं. प्रत्युत्तरात हैदराबाद संघाला 19.2 षटकांत सर्व विकेट्स गमावून केवळ 125 धावाच केल्या. यामुळे 67 धावांनी हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागलाय. 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला पहिला धक्का कर्णधार केन विल्यमसनच्या रूपाने बसला तो चेंडू न खेळताच धावबाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने पहिल्याच षटकात अभिषेक शर्माला क्लीन बोल्ड केलं. राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 58 धावा केल्या. त्याने 37 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार ठोकले. पूरनने 19 आणि मार्करामने 21 धावा केल्या.
हैदराबाद विरुद्ध बंगलौरचे हायलाईट्स व्हिडीओ, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
That’s that from Match 54. @RCBTweets win by 67 runs and add two important points to their tally.#TATAIPL pic.twitter.com/YOHIVDY3mT
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2022
सुपर षटकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बंगळुरूची सुरुवातही खराब झाली. विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. या मोसमात विराट तिसऱ्यांदा खातेही न उघडता बाद झाला आहे. फाफ डू प्लेसिसने अर्धशतक ठोकले. रजत पाटीदार 48 धावा करून बाद झाला. मॅक्सवेल 33 धावा करून बाद झाला. त्याचवेळी फाफ डू प्लेसिस 73 आणि दिनेश कार्तिक 8 चेंडूत 30 धावा करून नाबाद माघारी परतले.
Match 54. WICKET! 0.1: Virat Kohli 0(1) ct Kane Williamson b Jagadeesha Suchith, Royal Challengers Bangalore 0/1 https://t.co/tEzGa5T0Do #SRHvRCB #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2022
A wicket of the first delivery for J Suchith as Virat Kohli departs for a duck.
Live – https://t.co/3yEu02Zm5l #SRHvRCB #TATAIPL pic.twitter.com/xWOaRnUqm3
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2022
बंगळुरूचा फिरकीपटू हसरंगानं या सामन्यात 5 विकेट घेतल्या आहेत. त्याने चौथ्या षटकात शंशाकला पहिला झेलबाद करून चौथी विकेट घेतली. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर उमरानला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
हसरंगाच्या पाच विकेट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
How good has Hasaranga been today ??
Follow the match ? https://t.co/tEzGa6a3Fo#TATAIPL | #SRHvRCB pic.twitter.com/gfCN5pXCQe
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2022
Wanindu with an absolutely brilliant spell in hasiru-ranga. ??
Well bowled, @Wanindu49! ??#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #GoGreen #ForPlanetEarth #SRHvRCB pic.twitter.com/7Hw3HPXWS4
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 8, 2022
आज सलामीवीर विराट कोहली डावखुरा फिरकी गोलंदाज जगदीश सुचिताच्या बॉलिंगवर शुन्यावर आऊट झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. केन विलियमसनकडे सोपा झेल त्याने दिला. डू प्लेसिसने आज डावाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्यामुळेच RCB च्या अन्य फलंदाजांना मोकळेपणाने फटकेबाजी करता आली. फाफ डू प्लेसिसने अर्धशतक ठोकले.