बांगलादेशच्या कर्णधारने विजयाचे संपूर्ण श्रेय भारताच्या या दोन खेळाडूंना दिलं, दोन वाक्यात गणित मांडलं

| Updated on: Oct 01, 2024 | 2:47 PM

पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर बांग्लादेश संघाने डरकाळी फोडली होती. भारताला पराभूत करू असं थेट पत्रकार परिषदेत सांगतिलं होतं. पण भारताने बांगलादेशची संपूर्ण हवाच काढली. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने धोबीपछाड दिला.

बांगलादेशच्या कर्णधारने विजयाचे संपूर्ण श्रेय भारताच्या या दोन खेळाडूंना दिलं, दोन वाक्यात गणित मांडलं
Image Credit source: BCCI
Follow us on

बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका भारताने 2-0 ने जिंकली. या मालिकेत भारताने बांगलादेशला कुठेच डोकं वर काढू दिलं नाही. या मालिकेपूर्वी बांगलादेशची कॉलर एकदम टाईट होती. पाकिस्तानला त्यांच्यात भूमीत लोळवल्यानंतर ही मालिका होणार होती. त्यामुळे मालिकेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पराभव करण्याचा इशारा दिला होता. पण या घोषणा आता हवेत विरळ्या आहेत. भारताला पराभव करण्याचं सोडा, या मालिकेत कमबॅक करण्याची संधीही भारताने दिली नाही. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशला 280 धावांनी पराभूत केलं. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 7 विकेट राखून विजय मिळवला. खरं तर दुसरा कसोटी सामन्यात भारताने जबरदस्त खेळी केली. दोन दिवसांचा खेळ वाया गेला तरी जबरदस्त कमबॅक केलं. या विजयाची रोपणी खऱ्या अर्थाने चौथ्या दिवशीच झाली होती. भारताने चौथ्या दिवशी ऐतिहासिक अशी खेली आणि विजय दृष्टीक्षेपात आणला. पाचव्या दिवशी अपेक्षेप्रमाणे खेळ झाला आणि विजय मिळवला.भारताने बांगलादेशला 2-0 ने पराभूत केलं. या मालिका पराभवानंतर बांगलादेशचा कर्णधार नजमुल शांतो याने मन मोकळं केलं. तसेच विजयाचं श्रेय भारताच्या दोन खेळाडूंना दिलं.

बांगलादेशचा कर्णधार नजमुल शांतो याने सामन्यानंतर पराभवाचं विश्लेषण केलं. ‘दोन्ही कसोटी सामन्यात आम्ही काही चांगलाी फलंदाजी केली नाही. अशा परिस्थितीत आम्हाला चांगाली फलंदाजी करणं गरजेचं होतं. जर तुम्ही आमच्या फलंदाजांकडे पाहिलं तर ते 30 ते 40 चेंडू खेळून बाद होत होते. पण ज्या पद्धतीने आर अश्विन आणि रवींद्र जडेजा खेळले ते खरंच जबरदस्त होतं. त्याच्या भागीदारीचा आम्हाला फटका बसला. आमच्याकडून मोमिनूलने चांगली खेळी केली. तसेच मिराजने चांगली गोलंदाजी केली.’, असं बांगलादेशचा कर्णधार नजमुल शांतो याने सांगितलं.

पहिल्या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकला आणि गोलंदाजी स्वीकारली. भारताने आर अश्विनचं शतक आणि रवींद्र जडेजाच्या 86 धावांच्या खेळीवर 376 धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठला करताना बांगलादेशचा संघ 149 धावांवर गडगडला. भारताकडे 227 धावांची आघाडी होती. पण फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी केली. 4 गडी बाद 287 धावा करत डाव घोषित केला. बांगलादेशला दुसऱ्या डावात 234 धावा करता आल्या आणि भारताने 280 धावांनी विजय मिळवला. खरं तर आर अश्विन आणि रवींद्र जडेजा खेळला नसता तर या सामन्याचं चित्र वेगळं असू शकलं असतं.