BAN vs WI : बांगलादेशचा वेस्ट इंडिजला त्यांच्याच भूमीवर दणका, टी20 मालिकेत क्लिन स्विप

| Updated on: Dec 20, 2024 | 8:04 PM

बांग्लादेश वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून टी20 मालिकेत व्हाईटवॉश दिला आहे. बांगलादेशने तीन सामन्यांची टी20 मालिका 3-0 ने खिशात घातली. वेस्ट इंडिजचा संघ तिसऱ्यांदा धावांचा पाठलाग करताना अपयशी ठरला.

BAN vs WI : बांगलादेशचा वेस्ट इंडिजला त्यांच्याच भूमीवर दणका, टी20 मालिकेत क्लिन स्विप
Follow us on

बांगलादेशचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत जबरदस्त कामगिरी केली. वेस्ट इंडिजला तीन सामन्यात क्लिन स्विप देत मालिका 3-0 ने जिंकली. बांगलादेशने पहिला सामना 7 धावांनी जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात 27 धावांनी विजय मिळवला. तर तिसऱ्या सामन्यात 80 धावांनी मोठा विजय मिळवत वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिला. तिन्ही सामन्यात वेस्ट इंडिजला धावांचा पाठलाग करण्यात अपयश आलं. तिसऱ्या टी20 सामन्यात बांगलादेशने 20 षटकात 7 गडी गमवून 189 धावा केल्या होत्या. या सामन्यात चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या जाकिर अलीने सर्वाधिक धावा केल्या. जाकीरने 41 चेंडूत नाबाद 72 धावा केल्ाय. यावेळी त्याने 6 षटकार मारले. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात एकदम खराब झाली. 46 धावा असताना निम्मा संघ तंबूत होता. त्यामुळे पराभव तेव्हाच निश्चित झाला होता. त्यानंतर 16.4 षटकात संपूर्ण संघ बाद झाला आणि बांगलादेशने 80 धावांनी विजय मिळवला.

पराभवानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमॅन पॉवेलने नाराजी व्यक्त केली. ‘मधल्या षटकांमध्ये आम्ही चांगली गोलंदाजी केली. पॉवरप्लेमध्ये आम्ही नियंत्रण ठेवले नाही आणि शेवटच्या षटकातही तीच चूक केली. फलंदाजीत आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट गमावल्या तर तुम्हाला संघर्ष करावा यात काही दुमत नाही. गेल्या 8 सामन्यांपासून ही स्थिती आहे. या चुका दुरुस्त करण्यासाठी आमच्याकडे आता थोडा वेळ आहे. आम्ही कदाचित मे 2025 पर्यंत टी20 मालिका खेळणार नाही. त्यामुळे खेळाडूंकडे लहान चुकांचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी वेळ आहे. आशा आहे की 2025 मध्ये छोट्या चुका सुधारल्या जातील.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

बांग्लादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास (विकेटकीपर/कर्णधार), परवेझ हुसेन इमोन, तन्झिद हसन, मेहदी हसन मिराझ, जाकेर अली, रिशाद हुसेन, महेदी हसन, शमीम हुसेन, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद, हसन महमूद

वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोस्टन चेस, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), जस्टिन ग्रीव्ह्ज, रोमॅरियो शेफर्ड, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय, जेडेन सील्स