AUS vs BAN | बांगलादेशकडून शेवटच्या सामन्यात जोरदार बॅटिंग, कांगारुंना 307 धावांचं आव्हान

| Updated on: Nov 11, 2023 | 2:41 PM

Australia vs Bangaldesh | बांगलादेशच्या फलंदाजांनी अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध जोरदार बॅटिंग करत 300 पार मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 307 धावा कराव्या लागणार आहेत.

AUS vs BAN | बांगलादेशकडून शेवटच्या सामन्यात जोरदार बॅटिंग, कांगारुंना 307 धावांचं आव्हान
Follow us on

पुणे | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 43 व्या सामन्यात बांगलादेशने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात जोरदार बॅटिंग केली आहे. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 307 धावांचं आव्हान दिलं आहे. बांगलादेशने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 306 धावा केल्या. बांगलादेशी फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत शानदार बॅटिंग केली. बांगलादेशच्या पहिल्या 7 फलंदाजांनी किमान 20 पेक्षा अधिक धावा केल्या. त्यामुळेच बांगलादेशला 300 पार मजल मारण्यात यश आलं.

बांगलादेशची बॅटिंग

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं. बांगलादेशने या निर्णयाचा चांगलाच फायदा घेत रंपाट बॅटिंग केली. बांगलादेशकडून ओपनिंग जोडी तांझिद हसन आणि लिटॉन दास या दोघांनी प्रत्येकी 36 धावा केल्या. कॅप्टन नजमूल शांतो याने 45 धावांची खेळी केली. तॉहिद हृदॉय याने सर्वाधिक 74 धावा केल्या. महमदुल्लाह याने 32 रन्स जोडल्या. विकेटकीपर मुशफिकुर रहिम याने 21 धावांचं योगदान दिलं. मेहदी हसन मिराज 29 धावा करुन आऊट झाला. तर नसून अहमद याने 7 रन्स केल्या. तर मेहदी हसन 2 आणि तास्किन अहमद 0 वर नाबाद परतले. ऑस्ट्रेलियाकडून सिन एबोट आणि एडम झॅम्पा या जोडीने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मार्क्स स्टोयनिस याने 1 विकेट घेतली.

बांगलादेशची पहिल्यांदाच अशी कामगिरी

दरम्यान बांगलादेशने वर्ल्ड कप 2023 मधील आपल्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात जाता जाता अविस्मरणीय अशी काामगिरी केली आहे. बांगलादेशने या 13 व्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच 300 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. बांगलादेशला याआधीच्या सामन्यांमध्ये एकदाही ही अशी कामगिरी करण्यात यश आलं नाही. त्यामुळे आता बांगलादेशचे गोलंदाजा 307 धावांचा बचाव करत शेवट विजयाने गोड करतात का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूडबेंच अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क.

बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), तांझिद हसन, लिटॉन दास, महमुदुल्ला, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), तॉहिद हृदॉय, मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान.