नवी दिल्ली | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 38 वा सामन्यात बांगलादेश विरुद्ध श्रीलंका आमनेसामने असणार आहेत. बांगलादेश क्रिकेट टीम वर्ल्ड कपमधून आधीच बाहेर पडली आहे. तर श्रीलंकासाठी जर तरची संधी आहे. बांगलादेश टीम पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहे. बांगलादेश आपल्या प्रतिष्ठेसाठी मैदानात उतरणार आहे. तर श्रीलंका सातव्या क्रमांकावर आहे. श्रीलंका सातव्या स्थानी कायम राहून आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 साठी क्वालिफाय करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या सामन्याबाबत आपण जाणून घेऊयात.
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना सोमवारी 6 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे.
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना मोबाईलवर हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 53 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये श्रीलंकाच बांगलादेशवर वरचढ राहिली आहे. श्रीलंकाने 53 पैकी 42 सामने जिंकले आहेत. तर 9 सामन्यात बांगलादेशने श्रीलंकावर विजय मिळवला आहे.
बांगलादेश क्रिकेट टीम | शकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), तांझिद हसन, लिटॉन दास, नजमुल हुसेन शांतो, महमुदुल्ला, तॉहिद हृदोय, मेहिदी हसन मिराझ, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, नसुम अहमद, महेदी हसन, हसन महमूद आणि तंजीम हसन साकिब.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चरित असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, दुष्मंथा चमीरा, महेश तीक्षना, कसून रजिथा, दिलशान मदुशांका, धनंजया डी सिल्वा, कुसल परेरा, चमिका करुणारत्ने, लहीरु कुमारा आणि दुनिथ वेल्लालागे.