Cricket in Olympic | ऑल्मिपिकमध्ये 128 वर्षांनंतर क्रिकेटचा समावेश, विराट कोहली याचा मोठा सन्मान

| Updated on: Oct 16, 2023 | 3:42 PM

IOC Session approves LA28 Proposal for 5 Additional Sports Including Cricket | क्रीडा चाहत्यांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता क्रिकेट चाहत्यांना आणखी रंगतदार सामने पाहायला मिळणार आहे.

Cricket in Olympic | ऑल्मिपिकमध्ये 128 वर्षांनंतर क्रिकेटचा समावेश, विराट कोहली याचा मोठा सन्मान
Follow us on

मुंबई | क्रीडा विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अखेर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. तब्बल 128 वर्षांनंतर क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान देण्यात आलं आहे. क्रिकेटसह एकूण 5 खेळांचा ऑलिम्पिकमध्ये समावेश केला गेला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची सोमवारी मुंबईत बैठक पार पडली. समितीने या बैठकीत क्रिकेटचा समावेश करण्यात आल्याची घोषणा केली. याबाबत ट्विटही करण्यात आलं आहे. ऑलिम्पिक 2028 चं आयोजन हे लॉस ऐंजलिसमध्ये करण्यात आलं आहे.

क्रिकेटसह या 5 खेळांचा समावेश

ऑलिम्पिकमध्ये 128 वर्षांआधी अखेरीस 1900 साली क्रिकेटचा समावेश होता. तेव्हा कसोटी क्रिकेट सामने खेळवण्यात आले होते. मात्र यंदा चित्र वेगळं असणार आहे. लोस ऐंजलिसमध्ये 2028 साली होणाऱ्या ऑलिम्पिक गेममध्ये टी 20 क्रिकेटचा थरार चाहत्यांना अनुभवयाला मिळणार आहे. आयओसीने क्रिकेटसह 5 खेळांना स्थान दिलंय. यामध्ये बेसबॉल/सॉफ्टबॉल, सिक्सेज, स्क्वॅशचा समावेश आहे. “2 सदस्यांनी याचा विरोध केला. तर एक सदस्य मतदानावेळेस गैरहजर होता”, अशी माहिती आयओसी अध्यक्ष थॉमस बाक यांनी दिली.

क्रिकेटमुळे ब्रॉडकास्टर्सची खोऱ्याने कमाई

आता क्रिकेटचा समावेश केल्याने आयओसीला ब्रॉडकास्ट राईट्सद्वारे 100 मिलियन यूएस डॉलर इतकी रग्गड कमाी होणार आहे. मेन्स आणि वूमन्स अशा एकूण 6 टीम सहभागी होतील. त्यामुळे टीम इंडियाची मेन्स आणि वूमन्स टीम ऑलिम्पिकमध्येही आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज असणार आहे. अर्थात त्यासाठी आणखी 5 वर्षांचा अवधी आहे.

ऑलिम्पिकमध्ये 5 खेळांचा समावेश

विराटचा खास सन्मान

दरम्यान आयोजकांनी ऑल्मिपिक 2028 मध्ये क्रिकेटचा समावेश करताना टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली याचा सन्मान केलाय. “विराटचे जगभरात असंख्य चाहते आहेत, हे त्याच्या सोशल मीडियावर असलेल्या फॉलोवर्सच्या आकड्यावरुन लक्षात येतं. विराटचे 340 मिलियन फॉलोअर्स आहेत. विराट सर्वाधिक फॉलोअर्स असणारा तिसरा खेळाडू आहे. ली ब्रोन, टॉम ब्रॅडी आणि वुड्स या तिघांचे जितेक फॉलोअर्स आहेत, त्यापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत”, असे गौरवउद्गार आयोजकांनी विराटबद्दल काढले.